रशियाने कोरोना व्हायरसवर लस शोधून काढल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. सोबतच त्यांच्या स्वतःच्या मुलीलासुद्धा ही लस दिल्याची त्यांनी सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर एका मुलीला लस देतानाचे फोटो व्हायरल होऊ लागले. हा फोटो पुतिन यांच्या मुलीचा असल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा फोटो पुतिन यांच्या मुलीचा नसल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फोटोला रिव्हर्स इमेज केले असता कळाले ही मुलगी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या नाही. ट्विटर या मुलीला लस देतानाचा व्हिडियो आढळला. रशियन भाषेतील माहितीनुसार, हा व्हिडियो रशियातील Burdenko Hospital मधील आहे. तेथे गेल्या महिन्यात कोविड लसीच्या चाचणीचा दुसरी टप्पा पार पडला होता. त्यावेळी 20 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

https://twitter.com/sornadejda53/status/1282630030443642881

अर्काइव्ह

हा धागा पकडून शोध घेतला असता कळाले की, लाल रंगाच्या टी-शर्टमधील या स्वयंसेविकेचे नाव नटालिया आहे. ती एस. एम. किरोव्ह मिलिटरी मेडिकल अकॅडमीमध्ये विद्यार्थिनी आहे. चाचणीच्या वेळी तिची मुलाखती तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ व्हिडियो येथे पाहा – Zvezda TV

मग पुतिन यांची मुलगी कोण?

व्लादिमर पुतिन यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्यांच्या सध्याच्या प्रेयसीकडून त्यांना 2015 एक मुलगी असल्याची चर्चा आहे. त्यांच्या दोन्ही मुलींची नावे मारिया आणि कॅटरिना असे आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, लस घेत असलेली ती मुलगी पुतिन यांची मुलगी नाही. तिचे नाव नटालिया असून, ती मिलिटरी मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

Avatar

Title:कोविडची लस घेणारी ही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी नाही; वाचा ती कोण आहे...

Fact Check By: Agastya Deokar

Result: False