
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून आर्टिकल 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काश्मीरचे पूर्व मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यामध्ये आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांच्या संपतीविषयी ना ना प्रकारचे दावे करण्यात येत आहे. त्यांचे काश्मीरमधील घर म्हणून एका आलीशान इमारतीचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
फेसबुक आणि ट्विटर वरीलप्रमाणे फोटो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, हे गुलाम नबी आझाद यांचे काश्मीरमधील घर आहे. या फोटोवरून त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे की, त्यांनी भ्रष्टाचार करून एवढी संपती जमा केली.
परंतु, हा फोटो खरंच नबी आझाद यांच्या घराचा आहे का?
गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर ट्रीप अॅडव्हायझर संकेतस्थळावर खालील फोटो आढळला. हा फोटो पोस्टमधील फोटोशी साम्य असणारा आहे. ललित ग्रुपच्या हे हॉटेल आहे. महाराज प्रताप सिंह यांनी 1910 साली ही इमारत बांधली होती. याविषयी अधिक ललित ग्रुपच्या अधिकृत वेबसाईटवर वाचा.

मूळ फोटो येथे पाहा – ट्रीप अॅडव्हायझर
यूट्युबवर या हॉटेलचा एक व्हिडियो आढळला. यामध्ये हॉटेलचा परिसर आणि इमारतीची सफर घडवलेली आहे. त्यावरून स्पष्ट होते की, हा फोटो श्रीनगर येथील द ललित ग्रँड पॅलेस या फाईव्ह स्टार हॉटेलचा आहे. तो गुलाम नबी आझाद यांच्या घराचा नाही.
वरील व्हिडियोत 35 व्या सेंकदाच्या फ्रेमची सदरील व्हायरल फेसबुक फोटोशी तुलना केल्यावर तर हे अधिकच स्पष्ट होते.

निष्कर्ष
श्रीनगरमधील द ललित ग्रँड पॅलेस या फाईव्ह स्टार हॉटेलचा फोटो गुलाम नबी आझाद यांचे घर म्हणून शेयर केला जात आहे. त्यामुळे अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये.

Title:श्रीनगरमधील फाईव्ह स्टार हॉटेलचा फोटो गुलाम नबी आझाद यांचे घर म्हणून व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
