
देशभरात CAB आणि NRC विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातही याबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाचे म्हणून समाजमाध्यमात अनेक व्हिडिओ फिरत आहेत. असाच एक व्हिडिओ आलोक पाठक आणि निलेश गोतारणे यांनी पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
हा व्हिडिओ दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करतानाचा आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेऊन ती रिव्हर्स इमेज केली. या परिणामात आम्हाला द गार्डियन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील 24 जानेवारी 2014 रोजीचे वृत्त दिसून आले. या वृत्तात देण्यात आलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला मारहाण करत त्याच्या पाकिटातून पैसे घेतले. कोणीतरी या घटनेचे गुप्त चित्रीकरण केले होते. हा व्हिडिओ आम आदमी पक्षाने आपल्या फेसबुक पेजवर टाकला. त्यानंतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
द गार्डियनच्या संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive
त्यानंतर आम्ही आम आदमी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजला भेट दिली. याठिकाणी 24 जानेवारी 2014 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असल्याचे आम्हाला दिसून आले. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
या संशोधनातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ सहा वर्ष जुना म्हणजेच 2014 मधील आहे. या व्हिडिओचा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नुकत्याच झालेल्या घटनांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.
Title:दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातील आंदोलनाचा म्हणून सहा वर्षापुर्वीचा व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False


