
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये कोणता नेता किती गर्दी जमवितो याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहेत. मोदींच्या सभेला गर्दी जमत नसल्याचा पुरावा म्हणून एका फोटो फिरत आहे. यामध्ये रिकाम्या खुर्च्या दिसतात. या फोटोची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.

एका युजरने वरील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो शेयर करून सोबत लिहिले की, नाष्ट्याची पिशवी खुर्चीवर ठेवूनसुद्धा लोकं मोदींच्या सभेला जमत नाहीत, यापेक्षा मोठा पराभव काय असणार.
काही युजर्सने या फोटोसह अमित शहा, योगी आदित्यनाथ यांचा देखील फोटो शेयर केला आहे.
तथ्य पडताळणी
पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर लाईव्ह हिंदुस्तान वेबसाईटवरील एक बातमी आढळली. यानुसार, 20 जानेवारी 2018 रोजी वाराणसी येथील काशी विद्यापीठाच्या मैदानावर “युवा उद्घोष” कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. 17 वर्षांपुढील युवक जे 2019 मध्ये मतदार होतील त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित होते.
म्हणजेच ही नरेंद्र मोदींची सभा नव्हती.
सविस्तर बातमी येथे वाचा – लाईव्ह हिंदुस्तान । अर्काइव्ह
अमित शाह यांनीदेखील ट्विटरवरून या कार्यक्रमाचे फोटो शेयर केले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडियो तुम्ही पाहू शकता.
विविध वृत्तस्थळांनी या कार्यक्रमाच्या वेळी अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्याचे वृत्त दिले आहे. अपेक्षेपेक्षा या कार्यक्रमाला गर्दी कमी होती. परंतु, या कार्यक्रमाचे फोटो 2019 लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पसरवून लोकांना अर्धसत्य माहिती दिली जात आहे.
अधिक येथे वाचा – नवभारत टाईम्स । अमर उजाला । अर्काइव्ह
निष्कर्ष
एका वर्षापूर्वीच्या युवा उद्घोष कार्यक्रमाचे फोटो लोकसभा 2019 च्या पार्श्वभूमीवर पसरविले जात आहे. हा कार्यक्रम नरेंद्र मोदींची सभा नव्हती. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे. ही पोस्ट आता फिरवून वाचकांना चुकीची माहिती दिली जात आहे.

Title:तथ्य पडताळणीः हा मोदींच्या सभेचा फोटो नाही; एक वर्ष जुना युवा उद्घोष कार्यक्रमाचा आहे
Fact Check By: Mayur DeokarResult: False
