
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते व मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेले आहेत.
खाली दिलेल्या सर्व व्हिडिओंची सत्यता रिव्हर्स इमेजद्वारे सर्चद्वारे केलेली आहे.
व्हिडिओ क्र. 1
कॅप्शन – “शिवराज आणि भाजपच्या बाजूने प्रचार करण्यास संत महात्म्यांनी नकार दिला, यावेळी भाजप केवळ 50 जागांवर मर्यादित राहणार असल्याचे संत म्हणाले.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
सत्य –
मूळ व्हिडिओ सध्याचा नसून तीन वर्षांपूर्वीचा आहे.
शिवराज सिंग चौहान यांनी एप्रिल 2020 साली एक बैठक बोलवली होती. ज्यामध्ये त्यांनी मध्यप्रदेश मधील धर्म प्रचारकांसोबत कोविड महामारीवर मात कशी करता येईल यावर चर्चा केली होती. संपूर्ण व्हिडिओ आपण येथे पाहू शकतात. या संबंधित अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.
व्हिडिओ क्र. 2
कॅप्शन – “शिवराज यांनी पराभव स्वीकारला. म्हणाले की, आपण 1250 रुपये देत होतो तर कमलनाथ 1500 रुपये देणार आहेत. आपण 450 रुपयांना स्वयंपाकाचा गॅस देण्याचे आश्वासन देत होतो, तो 500 रुपयांना गॅस सिलिंडर देतोय, ते इतर राज्यातही देत आहेत.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
सत्य –
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 13 जून रोजी राज्य सरकारचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. भोपाळ येथील सातपुडा भवनात लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचा संपूर्ण व्हिडिओ येथे पाहू शकतात.
व्हिडिओ क्र. 3
कॅप्शन – “ बिग ब्रेकिंग, कमलनाथ म्हणाले की, लाडली बेहन योजना बंद करणार, या योजनेत सहभागी असलेल्या सर्व भगिनींची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
सत्य –
कमलनाथ यांची ही सभा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे पार पडली होती. या ठिकाणी ते भाजपच्या लाडली बेहन योजनेबाबत बोलत नव्हते. मूळात ते संपूर्ण भाषणात छिंदवाड्याचा इतिहास आणि तिथून त्यांची राजकारणात कशी सुरुवात केली याबद्दल सांगितल होते. या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ येथे उपलब्ध आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले व्हिडिओ बनावट आहेत. शिवराज सिंग चौहान आणि कमलनाथ यांच्या नावाने एडिट केलेले व्हिडिओ चुकीच्या दव्यासह व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडिटेड व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्\
Written By: Sagar RawateResult: Altered
