
व्हीआयपीमराठी डॉट कॉम या फेसबुक पेजवरुन सध्या एक पोस्ट शेअर करण्यात येत आहे. या पोस्टमध्ये #महाराष्ट्रात हे ठिकाण कुठे आहे? अशी विचारणा करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
या पोस्टमध्ये दाखविण्यात आलेले छायाचित्र कुठले आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चचा वापर केला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.
परिणामातील गडकिल्ले @gadkille Instagram Profile | PicoMico या लिंकवर गेल्यावर आम्हाला हे ठिकाण म्हणजे गोव्यातील अगुआडा किल्ला असल्याचे दिसून आले. Pic credit @_sparker असे लिहिल्याचेही दिसून येत आहे. हाच शब्द फोटोतही बॅकराऊडला दिसत आहे.
गुगल स्ट्रीट व्ह्यूच्या सहाय्याने हे छायाचित्र टिपलेला भागही आम्ही शोधला आपण तो खाली पाहू शकता.
निष्कर्ष
छायाचित्रात दर्शविण्यात आलेला अगुआडा किल्ला हा महाराष्ट्रात नसुन गोव्यातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.
