
पाकिस्तानी मेहमान नवाझी अशी माहिती देत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे एक छायाचित्र Subhash Deodhar यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्ट तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणी
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे हे छायाचित्र खरे आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला यात पत्र सुचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर एक छायाचित्र आम्हाला दिसून आले. या छायाचित्राखाली प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी 23 जनवरी, 2018 को दावोस में इंटरनेशनल बिजनेस काउंसिल कार्यक्रम के दौरान विश्व की शीर्ष कंपनियों के मुख्य कार्यकारी अधिकारियों (सीईओ) से मुलाकात करते हुए। असे हिंदी भाषेत लिहिले असल्याचे आम्हाला दिसून आले. याचा मराठी भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2018 रोजी दावोस येथे जगभरातील प्रमुख कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेताना असा स्वैर अनुवाद होतो. हे छायाचित्र आपण खाली पाहू शकता.
पीआयबीच्या संकेतस्थळावरील छायाचित्र / Archive
आपण या मुळ छायाचित्रातील आणि खोट्या छायाचित्रातील फरक खाली पाहू शकता.
फायनॅशल एक्स्प्रेस या अर्थविषयक इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावरही त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या या भेटीचे वृत्त छायाचित्रासह प्रसिध्द करण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयानेही हे छायाचित्र त्यावेळी ट्विट केले होते. द क्विंटने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते.
निष्कर्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावोस येथे 2018 मध्ये जगभरातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या छायाचित्रात फेरफार करत इम्रान खान यांचे हे बनावट छायाचित्र तयार करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे हे छायाचित्र किती खरे?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
