नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे यांचा RSS शिबिरातील हा फोटो नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात काढलेल्या या फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि अण्णा हजार दिसत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. या फोटोमधील व्यक्ती अण्णा हजारे नाहीत.

काय आहे दावा?

एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करून म्हटले की, फोटोत नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे दिसत आहेत. सोबत लिहिले की, “RSS च्या शिबीरातील दोन **** एकत्रीतपणे काढलेला दुर्मिळ फोटोग्राफ्स. माणसाचे चरीत्र आणि चारित्र्य समजायला पुरेसा आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा फोटो शेअर होत आहे. फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबतची व्यक्ती अण्णा हजारे नाहीत.

मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त 2019 साली प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत हा फोटो वापरण्यात आला आहे. सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा फोटोत नरेंद्र मोदी ज्यांना आपले गुरू मानतात ते लक्ष्मणराव इनामदार आहेत. 

मूळ बातमी – लोकमत 

कोण आहेत लक्ष्मणराव इनामदार?

लक्ष्णराव इनामदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते. त्यांच्या जन्म जरी महाराष्ट्रात झाला असला तरी त्यांनी गुजरातमध्ये पूर्णवेळ संघाचे प्रचारक म्हणून काम केले. त्यांना लोक ‘वकील साहेब’ म्हणून ओळखले जायचे. 

लक्ष्मणराव यांनीच नरेंद्र मोदी यांना संघामध्ये सामील करून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी यांची कारकीर्द सुरू झाली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी लक्ष्मणराव यांना आपले गुरू मानतात.


हेदेखील वाचा:

नरेंद्र मोदी यांनी मुकेश अंबानींच्या नातवाला दवाखान्यात जाऊन भेट दिली का?

नरेंद्र मोदी यांचा बालपणी योग करतानाचा हा व्हिडिओ आहे का?

नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा हा व्यक्ती हाथरस घटनेतील आरोपीचे वडील आहेत का?


बीबीसी हिंदीच्या एका लेखामध्ये या दोघांचाही रंगीत फोटो प्रसिद्ध झालेला आहे. तो आपण खाली पाहू शकता.

नरेंद्र मोदी आणि लक्ष्मणराव इनामदार

मूळ लेख – बीबीसी हिंदी

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो नरेंद्र मोदी आणि संघाचे प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांचा आहे. तो फोटो मोदी आणि अण्णा हजारे यांचा नाही. 

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये!]

Avatar

Title:नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे यांचा RSS शिबिरातील हा फोटो नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False