
इंदिरा गांधी यांचे पर्वतरांगेच्या पायथ्याशी सैनिकांना संबोधन करतानाचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र गलवान खोऱ्यातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा फोटो लेह येथील असल्याचे समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?

तथ्य पडताळणी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गलवान खोऱ्याला भेट दिल्याचे हे छायाचित्र आहे का? हे जाणून घेण्यासाठी ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी art-sheep.com या संकेतस्थळावरील एक लेख आढळला. त्यातील माहितीनुसार हे छायाचित्र इंदिरा गांधींनी 1971 साली लेह येथे जवानांना संबोधित केले त्यावेळचे आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर संग्रहित छायाचित्रांमध्ये या फोटोचा शोध घेतला. पीटीआयनेदेखील हे छायाचित्र लेह येथील असल्याचे म्हटले. गलवान खोरे लेहपासून 200 किमी दूर आहे.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, इंदिरा गांधींचा हा फोटो गलवान खोऱ्यातील नाही. त्यांनी लेह येथे 1971 साली सैनिकांना संबोधित केले होते. त्याचा हा फोटो आहे.

Title:इंदिरा गांधींचे हे छायाचित्र गलवान खोऱ्यातील नाही. वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
