Coronavirus: नरेंद्र मोदींनी इंटरनेट 10 दिवस बंद करण्याची घोषणी केलेली नाही. ती फेक न्यूज आहे.

Coronavirus False

कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असून मृतांचा आकडा आता 24 हजारांच्या पुढे गेला आहे. भारतातदेखील विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉक-डाऊन जाहीर करण्यात आला आहे. आणीबाणीच्या अशा परिस्थितीमध्ये फेक न्यूज आणि अफवांना पेव फुटला आहे. आता अफवा पसरली आहे की, कोरोनामुळे देशात आज रात्री 12 वाजल्यांपासून 10 दिवसांकरिता इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे, अशी घोषणा खुद्द पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी याबाबतीत पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे पोस्टमध्ये?

WhatsApp Image 2020-03-27 at 4.19.32 PM.jpeg

मोदींचा फोटो असलेला असे एक ग्राफिक आजतक वाहिनीच्या नावेदेखील व्हायरल होत आहे. यात म्हटले की, लोकांमध्ये कोरोनाविषयक भीती वाढू नये यासाठी एक आठवडा इंटरनेट बंद करण्याचा निर्णय मोदींनी घोषित केला.

596ea0f4-adb7-46b3-8911-5f7483c1db67.jpg

तथ्य पडताळणी

कोरोना व्हायरसविषयी समाज माध्यमात खूप चुकीची माहिती पसरलेली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात या रोगाविषयी अनेक गैरसमज तयार झालेले आहेत. या भीतीचे पर्यवसन गोंधळात होऊ नये म्हणून सरकारने खरंच असा काही निर्णय घेतला का?  याचा आम्ही शोध घेतला.

सरकारने असा निर्णय घेतल्याचे आम्हाला कुठेच आढळले नाही. अशी अधिकृत घोषणा झाल्याचे सापडले नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील फोटोंमध्ये एकामध्ये सात दिवस (एक आठवडा) आणि एकात 10 दिवस इंटरनेट बंद राहणार असल्याचे म्हटले. म्हणजे दोन्हीकडे विसंगत माहिती आहे. तसेच या दोन्ही ग्राफिक्सची क्वालिटी आणि रचना पाहून हे काही अधिकृत वाहिनीच्या बातम्या वाटत नाही. कोणी तरी फोटोशॉपद्वारे तसे केले असण्याची शक्यता.

या मेसेजची सत्यता तपासण्यासाठी आम्ही पत्र व सूचना मंत्रालयाच्या (PIB) फॅक्ट चेक विभागाकडे तपास केला. त्यातून कळाले की, इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय खोटा आहे.

अर्काइव्ह

पीआयबीने सांगितले की, कोरोनाच्या जागतिक साथीदरम्यान इंटरनेट स्थगित करण्यात आल्याचा मेसेज खोटा आहे. सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणत्याही मेसेजची पडताळणी केल्याशिवाय तो फॉरवर्ड करू नका.

 निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, कोरोनाच्या लॉक-डाऊन काळात इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पंतप्रधान मोदींच्या नावे फिरणारा तो मेसेज फेक आहे.

Avatar

Title:Coronavirus: नरेंद्र मोदींनी इंटरनेट 10 दिवस बंद करण्याची घोषणी केलेली नाही. ती फेक न्यूज आहे.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False