एक एप्रिलपासून व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निग मेसेज शेअर केल्यावर जीएसटी द्यावा लागणार का ? वाचा सत्य 

False राजकीय | Political

एका बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. त्या बातमीमध्ये दावा केला आहे की, 1 एप्रिलपासून व्हॉटसअॅपवर गुड मॉर्निगचे मेसेज शेअर केल्यावर त्यावर जीएसटी भरावा लागणार आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  

पडताळणी अंती कळाले की, व्हायरल बातमी 6 वर्षांपूर्वीची आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल बातमीमध्ये लिहिले आहे की, “1 एप्रिलपासून सरकार गुड मॉर्निंगच्या संदेशांवर कर लावणार आहे. कम्युनिकेशन मंत्रालयाचे मुख्य सचिव लेख पाल यांच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सॲप मेसेंजर वापरकर्त्यांनी पाठवलेल्या सर्व गुड मॉर्निंग संदेशांचा हिशोब ठेवेल. अशा संदेशांवर 18 टक्के जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. हे बिल महिन्याच्या शेवटी मोबाईल बिलासह भरावे लागेल.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम असा कोणता निर्णय सरकारने घेतला असता तर ही एक मोठी बातमी ठरली असती परंतु, व्हायरल बातमीचे स्रीनशॉर्ट वगळता अशी कोणतीही बातमी माध्यमांमध्ये आढळली नाही.

कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल बातमी 6 वर्षांपूर्वीची आहे.

एबीपी लाईव्हने 20 मार्च 2018 रोजी या बातमीचा पाठ पुराव करणारा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओनुसार ही बातमी 2 मार्च 2018 रोजी नवभारत टाईम्स वृत्तपत्रानी दिल्लीतून प्रकाशित केली होती. 

विशेष म्हणजे इतर कोणत्याही वृत्तपत्रात “सरकार गुड मॉर्निंग मेसेज वर जीएसटी लावणार आहे.” अशी बातमी प्रकाशीत झालेले आढळले नाही.  

पहिल्या पानावर छापलेल्या या बातमी खाली “बुरा न मानो होली है” असे लिहिले होते.

अर्थात सहा वर्षांपूर्वी होळी निमित्त नवभारत टाईम्सने ही उपहासात्मक बातमी प्रसिद्ध केली होती.

तसेच जीएसटी आणि वित्त मंत्रालय या दोन्ही वेसबसाइटवर ‘सरकार व्हॉटसअॅप मेसेजवर 18 % जीएसटी लावणार’ अशी कोणती माहिती दिलेली नाही.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल बातमी खोटी असून सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सहा वर्षांपूर्वी नवभारत टाईम्सने होळी निमित्त ही उपहासात्मक बातमी प्रसिद्ध केली होती. भ्रामक दाव्यासह ही बातमी पुन्हा व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:एक एप्रिलपासून व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निग मेसेज शेअर केल्यावर जीएसटी द्यावा लागणार का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False