
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक एका ढाब्यामध्ये गटारीच्या पाण्यावरून वाद घलताना दिसतात.
दावा केला जात आहे की, या ठिकाणी शमा ढाब्यामध्ये बिर्याणीसाठी गटारीचे पाणी वापरले जाते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. हे प्रकरण गटारीच्या पाण्यातून बिर्याणी बनवल्याचे नाही.
काय आहे दावा ?
या व्हिडिओमध्ये शामा ढाबा असे नाव दिसते आणि काही लोक ढाब्यामध्ये गटारीच्या पाण्यावरून वाद घलताना दिसताता.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “गटारीच्या पाण्यात तयार होते बिर्याणी.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर हा व्हिडिओ हरियाणातील पिंजोर भागातील कलका रोडच्या शामा ढाब्याचा असल्याचे कळाले.
फॅक्ट क्रेसेंडोने शामा ढाब्याचे मालक सदाम अली यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संगितले की, “व्हिडिओमधील घटना 14 ऑगस्ट रोजी घडली होती. या ठिकाणी ढाब्यासमोर रोजच नाल्याचे पाणी साचत असते. आमच्या ढाब्यावर काम करणारा माणूस रोज स्वतःहून ती घाण महापालिकेच्या ट्रकमध्ये टाकतो. पण त्या दिवशी ट्रक आला नाही म्हणून आमच्या माणसाने सकाळी आणि संध्याकाळी पाणी बाहेर काढून रस्त्यावर टाकले. रस्त्यावर पाणी टाकले जात असल्याने येता जाता लोकांना त्या घाण पाण्याचा वास येत असल्याने व्हिडिओत दिसणारे असलेल्या लोकांनी त्याचा विरोध केला. नंतर संध्याकाळी पुन्हा पाणी टाकल्यावर आमच्या माणसाला धमकावून त्याच्याशी गैरवर्तन करत होते. हा सर्व प्रकाराला संपवण्यासाठी आमच्या माणसाने त्यांना पाच हजार रुपये देण्याचेही सांगितले होते. हे इतकेच प्रकरण होते.
व्हिडिओसोबत व्हायरल दाव्याचे शामा ढाब्याच्या मालकाने खंडण करत सांगितले की, “हा दावा खोटा आहे. या ठिकाणी गटाराच्या पाण्याने बिर्याणी बनवण्यात येत नाही.”
आपल्या ढाब्यात कशा पद्धतीने अन्न तयार केले जाते हे दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला त्यांच्या ढाब्याचा एक व्हिडिओ पाठवला आहे, ज्यामध्ये त्यानी आपण स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्यात स्वयंपाक करतो आणि कोणते गटारीचे पाणी बाहेर टाकतो.
पुढे आम्ही पिंजोर पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी करमबीर सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, “या व्हिडिओद्वारे करण्यात आलेला दावा खोटा आहे. हे प्रकरण नाल्याच्या पाण्याने बिर्याणी बनवण्याचा नाही. शामा ढाबा नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर टाकत असल्याने आजूबाजूच्या लोकांचा आक्षेप होता. यामुळे व्हिडिओमधील लोक ढाब्याच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत होते.”
केरळमधील एका हॉटेलमध्ये हिंदू ग्राहकांच्या बिर्याणीत नपुंसक/वंध्यत्वाच्या गोळ्या टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा केला जात होता. फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीच फॅक्ट-चेक प्रकाशित करून ही खोटी माहिती असल्याचे सिद्ध केले आहे. जुने आणि एकमेकांशी संबंध नसलेले फोटो एकत्र करून धार्मिकद्वेष व भीती पसरविली जात आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. हे प्रकरण गटारीच्या पाण्यातून बिर्याणी बनवल्याचे नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:ढाब्यामध्ये गटारीच्या पाण्यातून बिर्याणी बनवली जात नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
