माजी पंतप्रधान डॉ. मनमोह सिंग यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत नरेंद्र मोदींची स्तुती केली. अशा ट्विटचा स्क्रिनशॉर्ट व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, माजी पंतप्रधान डॉ.मनमोह सिंग यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरुन हे ट्विट केले की काँग्रेस त्यांना मनाप्रमाणे काम करू देत नव्हती आणि नरेंद्र मोदी स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ट्विट बनावट आहे. डॉ. मनमोह सिंग यांनी असे कोणतेही ट्विट केले नाही.

काय आहे दावा ?

या व्हायरल ट्विटमध्ये लिहिलेले आहे की, "तेव्हा मी देखील मोठे मोठे निर्णय घेऊ शकलो असतो, परंतु, काँग्रेसने मला कधी माझ्या मनाप्रमाणे काम करू दिल नाही, नरेंद्र मोदी स्वत: च निर्णय घेतात आणि यामुळेच देशाची प्रगती होत आहे."

“आज मी खुल्या मनाने सांगतो की, मोदीसारखा नेता आणि प्रधानमंत्री या जगात पुन्हा जन्माला येणार नाही."

व्हायरल ट्विटचे स्क्रिनशॉर्ट शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “बघा आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय म्हणतात. देशाला गरज मोदीजी,योगीजी आणि गडकरी साहेबांचीच.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताणळी

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी असे विधान केले असते तर नक्कीच मोठी बातमी झाली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी कुठेच आढळली नाही.

पुढे, व्हायरल स्क्रिनशॉर्टमधील @manmohan_5 ही ट्विटर आयडी सर्च केल्यावर, हे अकाउंट डिलीट केल्याचे आढळले.

मूळ पोस्ट – ट्विटर

हा व्हायरल स्क्रिनशॉर्ट अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय संयोजक सरल पटेल यांनी 19 जून 2020 रोजी व्हायरल ट्विटचे खंडण केला. त्यांनी ट्विट द्वारे सांगितले की, “व्हायरल होत असलेले ट्विट डॉ. मनमोहन सिंग यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरुन शेअर करण्यात आलेले नाही. ते अकाउंट बनावट आहे. तसेच लोकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”

https://twitter.com/SaralPatel/status/1273891045378383873?s=20

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ट्विटचे स्क्रिनशॉर्ट हे बानावट अकाउंट वरुन शेअर केले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोह सिंग यांनी असे कोणतेही ट्विट शेअर केलेले नाही. खोट्या दाव्यासह स्क्रिनशॉर्ट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसचा विरोध करत नरेंद्र मोदींची स्तुती केली का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False