सत्य पडताळणी : स्वीस बँकेच्या नावाने व्हायरल होणारे हे पत्र खरे आहे का?

False राजकीय | Political

स्वीय बँकेत पैसा असणाऱ्यांच्या नावाची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या यादीत दहा भारतीयांची नावे देण्यात आली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पत्राची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम स्वीस बँक कॉर्पोरेशन नेमके काय हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वीस बॅंक कॉर्पोरेशनचे 1998 मध्ये युबीएसमध्ये मर्जर झाल्याचे आम्हाला दिसून आले. त्यामुळे स्वीस बँकेने 2011 मध्ये कसे पत्र लिहिले असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आक्राईव्ह लिंक

या पत्रात हे पत्र इंडियन गर्व्हमेंटला लिहिल्याचे दिसत आहे. हे पत्र खरं तर गर्व्हमेंट ऑफ इंडियाला किंवा विशिष्ट विभागाला लिहिल्याचं अपेक्षित आहे.

या पत्रात स्वित्झर्लंडचा कोड 0044 असा दर्शविण्यात आला आहे. हा कोड नेमका कोणत्या देशाचा आहे याची पडताळणी आम्ही केली. तेव्हा हा क्रमांक +44 असल्याचे व तो ब्रिटन व अन्य ठिकाणचा असल्याचे समोर आले. स्वित्झर्लंडचा कोड 41 असल्याचे दिसून आले.

(माहिती स्त्रोत : desakoda.info )

या पत्रात देण्यात आलेले आकडे हे रुपयांमध्ये आणि कोटीत देण्यात आले आहेत. ते डॉलर आणि युरोत देण्यात आलेले नाहीत. स्वीस बँक असे आकडे भारतीय रुपयांमध्ये का देईल, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

या पत्रात मॅनेजर म्हणून स्वाक्षरी करणारे Martin De Sa’ Pinto हे कोण आहेत याची पडताळणी केली असता ते त्या काळात आर्थिक घडामोडींविषयी वार्ताकन करणारे रॉयटर्सचे पत्रकार असल्याचे दिसून येत आहे.

आक्राईव्ह लिंक   

निष्कर्ष

स्वीस बँक कॉर्पोरेशन ही संस्था अस्तित्वात नसून तिचे युबीएसमध्ये विलीनीकरण झालेले आहे. हे विलीनीकरण 1998 मध्ये झाले आहे. या पत्रावर 2011 मधील तारीख आहे. पत्रावर असणारी स्वाक्षरी आणि शिक्काही बनावट आहे. ज्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे ती प्रत्यक्षात पत्रकार आहे. बॅंकेचा क्रमांक देताना देण्यात आलेला देशाचा दुरध्वनी कोडही चुकीचा आहे. या सर्व बाबींवरुन हे पत्र बनावट असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे पत्र असत्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : स्वीस बँकेच्या नावाने व्हायरल होणारे हे पत्र खरे आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False