सत्य पडताळणी : मोदींचा पराभव झाल्यास मी आत्महत्या करेल, स्मृती इराणींचे वक्तव्य

False राजकीय | Political

अगर प्रधानमंत्री मोदीजी हारे तो में आत्महत्या कर लुंगी-स्मृती इरानी अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. स्मृती इराणी यांनी खरेच असे वक्तव्य केले आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

अगर प्रधानमंत्री मोदीजी हारे तो में आत्महत्या कर लुंगी-स्मृती इरानी असे वक्तव्य स्मृती इराणी यांनी खरेच केले आहे का? याचा शोध घेत असताना आम्हाला एनडीटीव्हीचे हे वृत्त दिसून आले. यात त्यांनी आपण कधी राजकीय संन्यास घेऊ याबाबत वक्तव्य केले आहे. मोदींचा पराभव झाल्यास मी झाल्यास मी आत्महत्या करेल, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकानेही स्मृती इराणी यांनी मोदी हे निवृत्त होतील त्या दिवशी आपण राजकारण सोडू याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तात त्यांनी कुठेही मोदी यांचा पराभव झाल्यास आपण आत्महत्या करु असे म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

खाली दिलेल्या लिंकवर आपण त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओही पाहू शकतो.

स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मोदींबाबत अन्य काही वक्तव्ये केली आहेत का? याबाबत तपास केला असता आम्हाला खालील वक्तव्य दिसून आले. कुठेही मोदी यांचा पराभव झाल्यास आपण आत्महत्या करु असे वक्तव्य आढळून आले नाही.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

स्मृती इराणी यांनी मोदी यांच्याबद्दल वेगवेगळी वक्तव्ये केली असल्याचे दिसून येते  मोदी यांचा पराभव झाल्यास आपण आत्महत्या करु असे वक्तव्य त्यांनी केल्याचे कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : मोदींचा पराभव झाल्यास मी आत्महत्या करेल, स्मृती इराणींचे वक्तव्य

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False