
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये मिहान प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत असे म्हणण्यात आले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट नाना महाराष्ट्राचा लढवय्या शेतकरी नेता या पेजवरुन व्हायरल झाले आहे. या पोस्टला 157 शेअर्स, 2 हजार 800 लाईक्स आणि 284 कमेंटस् मिळाले आहेत.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर विविध पेज आणि अकाउंटवरही याविषयावर पोस्ट व्हायरल झालेली आहे.
मिहान हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे नागपुर येथील विमानतळाचा विस्तार, विविध सुविधांचा उपयोग करत नागपूरमध्ये उद्योग आणि दळणवळण यांचा मिलाप करत कार्गो हब बनण्याचा हा प्रकल्प आहे.
मिहान प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांना दिला जाणारा मोबदला हा विषय नेहमीच लक्ष वेधणारा विषय आहे. व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मिहान प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांना नोकरी मिळाल्या नाहीत. या विषयावर सत्य शोधण्यासाठी गुगलवर मिहान प्रकल्पग्रस्त असे टाईप केले. त्यानंतर या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.
मिहान प्रकल्पग्रस्तांना जमिनीसाठी मोबदला मिळाला असून, मिहान प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांना मिहान अंतर्गत नोकरी मिळाल्या की नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. परंतू मिहान प्रकल्प अंतर्गत लोकांना प्रत्यक्ष 10 हजार आणि अप्रत्यक्षपणे 20 हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे असे दैनिक भास्कर या वृत्तपत्राने 15 डिसेंबर 2017 रोजी बातमीमध्ये प्रसिद्ध केली आहे.
या विषयावर 18 मे 2018 रोजी मिहान प्रकल्पबाधितांना नोकरी देण्याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेत 1800 वारसदारांची यादी मिहान प्रकल्प अंतर्गत उद्योगांना मनुष्यबळासाठी देण्यात आली आहे. या विषयावर खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर माहिती वाचू शकता.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, मिहान प्रकल्पग्रस्त नातेवाईकांना नोकरी मिळाल्या नाहीत. परंतू मिहान प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्त नातेवाईकांना नोकऱ्या देणे शासनाला बंधनकारक नाही असे समोर आले आहे. परंतू अनेक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात पैसे मिळाले आहेत. या विषयावर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर दिले आहे. या विषयावर युट्युबवर देवेंद्र फडणवीस या युट्युब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
या विषयावर अधिक तपास करण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने मिहानच्या ऑफिशिअल वेबसाईटवर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतू मिहानसाठीची ऑफिशिअल वेबसाईट 09 एप्रिल 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करत नाही असे आढळले आहे.
https://madc.maharashtra.gov.in/index.php/information/rnr_mihan/
मिहान प्रकल्पग्रस्त नातेवाईकांच्या नोकरी संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या नागपूर जिल्हा या ऑफिशिअल वेबसाईटवर माहिती शोधली. येथे जिल्ह्याविषयी या कॉलमवर क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी उपलब्ध असलेला पर्याय औद्योगिक विकास येथे क्लिक केल्यानंतर मिहान असे येते. त्या ठिकाणी मिहानवर क्लिक केल्यानंतर मिहान विषयावर सविस्तर माहिती उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे मिहान प्रकल्प अंतर्गत 2011 – 2012 या वर्षासाठी 1000 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला अशी माहिती समोर आली आहे.
नागपूर महाराष्ट्र शासन । अर्काईव्ह
मिहान संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने मिहान प्रकल्प जनसंपर्क अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क केला. त्यांच्याकडून प्रकल्पग्रस्त नातेवाईकांना नोकरी मिळाल्याबद्दल कोणत्याही स्वरुपाची स्पष्ट आकडेवारी देण्यात आली नाही. परंतू भुसंपादन, भुसंपादन मोबदला याबद्दल नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील मनोज ठाकरे, भुसंपादन विभाग सहाय्यक अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून पाच लाख रुपये किंवा नोकरी असा पर्याय देण्यात आलेला होता. त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्तांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पाच लाख रुपये हा प्रस्ताव स्वीकारत नोकरीसाठीचा पर्याय सोडून दिला आहे, अशी माहिती दिली आहे.
मनोज ठाकरे
सहाय्यक अधिकारी
भुसंपादन विभाग,
मिहान कार्यालय, नागपूर.
त्याचप्रमाणे लोकसत्ता या वृत्तपत्रात मिहान प्रकल्पग्रस्तांना नोकरी संदर्भात 29 डिसेंबर 2015 रोजी बातमी प्रसिद्ध झाली आहे.
संपुर्ण संशोधनाअंती असे आढळून आले की, मिहान प्रकल्पग्रस्त नातेवाईकांना प्रत्यक्ष स्वरुपात नोकरी मिळाल्याचे समोर आलेले नाही, परंतू अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार मिळाला आहे असे समोर आले आहे.
निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट मिहान प्रकल्पग्रस्त नातेवाईकांना नोकरी मिळाली नाही हे तथ्य संमिश्र आहे. कारण प्रत्यक्ष स्वरुपात नोकरी मिळाली नसून, अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार मिळाल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे.

Title:मिहान प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळाल्या का ? : सत्य पडताळणी
Fact Check By: Amruta KaleResult: Mixture
