सत्य पडताळणी : चिकलठाणा विमानतळावर विमानाला आग?

False Headline

औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर विमानाला अचानक आग लागली, असे शीर्षक असलेले वृत्त दैनिक सकाळच्या संकेतस्थळाने दिले आहे. अशी घटना घडली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

दैनिक सकाळने दिलेल्या या वृत्तात सीआयएसएफ, पोलिस, अग्निशामक दल यांनी केलेली मॉक ड्रील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सकाळची ही पोस्ट फेसबुकवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर शीर्षक चुकीचे असल्याची प्रतिक्रियाही एका वाचकाने दिली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी :

औरंगाबाद येथील अग्निशमन दलाचे जनसंपर्क अधिकारी लालचंद गायकवाड यांच्याशी याबाबत आम्ही संपर्क साधला. औरंगाबाद येथील चिखलठाणा विमानतळावर आगीची कोणतीही घटना घडली नाही. तेथे मॉकड्रील घेण्यात आल्याची माहिती त्यांनी फॅक्ट क्रिसेंडोला दिली.

औरंगाबाद विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांच्याशी याबाबत आम्ही संपर्क साधला. औरंगाबाद येथील चिखलठाणा विमानतळावर आगीची कोणतीही घटना घडली नाही. सोशल मीडियावर याबाबत येत असलेली माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद विमानतळावर केवळ मॉकड्रील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निष्कर्ष :

औरंगाबाद येथे चिकलठाणा विमानतळावर विमानाला आग लागली नसल्याचे आमच्या तथ्य पडताळणीत आढळून आले आहे. विविध प्रशासकीय यंत्रणानीही याठिकाणी केवळ मॉकड्रील झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या वृत्ताचे शीर्षक चुकीचे असल्याचे आमच्या तथ्य पडताळणीत दिसून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : चिकलठाणा विमानतळावर विमानाला आग?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False Headline