देशात 25 सप्टेंबर 2020 पासून पुन्हा 46 दिवसांचा लॉकडाऊन लागू होणार असल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या संदेशाची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.09.24-20_42_51.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

देशात 25 सप्टेंबर 2020 पासून पुन्हा 46 दिवसांचा लॉकडाऊन लागू होणार असल्याचा संदेश खरा आहे का, याचा शोध घेतला त्यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे खालील ट्विट दिसून आले. या ट्विटनुसार देशात 25 सप्टेंबर 2020 पासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचे संदेश खोटा आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ज्या अहवालाच्या आधारे हा दावा करण्यात येत आहे. तो अहवालही खोटा असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1304803151082434560?

संग्रहित

निष्कर्ष

देशात 25 सप्टेंबर 2020 पासून पुन्हा 46 दिवसांचा लॉकडाऊन लागू होणार असल्याचा संदेश असत्य असल्याचे केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने म्हटले आहे.

Avatar

Title:देशात 25 सप्टेंबर 2020 पासून पुन्हा लॉकडाऊनचा संदेश खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False