सत्य पडताळणी : सैन्याच्या राजकीय वापर नको, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलं का राष्ट्रपतींना पत्र?

Mixture/अर्धसत्य राजकीय | Political

(फोटो सौजन्य : जम्मू लिंक न्यूज)

सैन्याच्या राजकीय वापर नको, 156 माजी लष्करी अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

सैन्याच्या राजकीय वापर नको याबाबत माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले का याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही शोध घेतला असता आम्हाला द हिंदूचे खालील वृत्त आढळून आले.

आक्राईव्ह लिंक

इंडिया टूडेने यातील काही अधिकाऱ्यांनी आपण पत्र लिहिल्याचा इन्कार केला असल्याचे वृत्त दिले आहे. आपण हे वृत्त खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता.

आक्राईव्ह लिंक

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे पण त्याचबरोबर यातील काही जणांनी याचा इन्कार केल्याचे ट्विटही दिले आहे.

आक्राईव्ह लिंक

एबीपी न्यूजनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. राष्ट्रपती भवनातील सुत्रांचा हवाला देत एबीपीने राष्ट्रपती भवनाला हे पत्र प्राप्त झाले नसल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ आपण खालील लिंकवर पाहू शकता.

बिझनेस टुडे या दैनिकानेही माजी अधिकाऱ्यांनी पत्र लिहिल्याचा इन्कार केल्याचे वृत्त दिले आहे.

आक्राईव्ह लिंक

एनडीटीव्हीने या घटनेबाबतचे वृत्तांकन करताना रिटायर्ड मेजर जनरल हर्षा ककर यांनी असे पत्र लिहिल्यासाठी आपली परवानगी घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. एनडीटीव्हीने या घटनेबाबत 10 ठळक मुद्दे आपल्या बातमीत मांडले आहेत.

आक्राईव्ह लिंक

हिंदूस्थान टाईम्स या वृत्तवाहिनेने याबाबत संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांचे वक्तव्य प्रसारित केले आहे. सितारमन यांनी या पत्राला बनावट असे म्हटले आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण हा व्हिडिओ पाहू शकता.

राष्टपती भवनच्या संकेतस्थळावर जाऊन आम्ही याबाबत पाहिले असता आम्हाला कोणतीही माहिती दिसून आली नाही.

आक्राईव्ह लिंक

निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरही आम्हाला याबाबत कोणतीही माहिती आढळून आली नाही.  

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

सैन्याचा राजकीय वापर नको, असे पत्र लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी लिहिले आहे का याबद्दलच प्रश्नचिन्ह आहे. यातील काही अधिकाऱ्यांनी हे वृत्त नाकारले आहे तर काहींनी हे स्वीकारले आहे. टीव्ही 9 मराठीने आपल्या वृत्तात याचा कुठेही याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे हे वृत्त फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत संमिश्र स्वरुपाचे आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : सैन्याच्या राजकीय वापर नको, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलं का राष्ट्रपतींना पत्र?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture