
जम्मू-काश्मीरमधील तीस वर्षीय इरम हबीब ही वैमानिक (पायलट) बनणारी काश्मीरमधली पहिली मुस्लीम महिला असल्याची पोस्ट सोशल मीडियावर आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
जम्मू-काश्मीरमधील तीस वर्षीय इरम हबीब ही वैमानिक (पायलट) बनणारी काश्मीरमधली पहिली मुस्लीम महिला आहे का, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही इरम हबीब या कोण आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्यासमोर खालील माहिती आली.

या माहितीत आमच्या समोर दोन नावे आली. ही दोन नावे इरम हबीब आणि सामी आरा अशी होती. त्यामुळे याबाबत अधिक शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

‘GreaterKashmir’ या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर 20 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार सामी आरा या पहिल्या काश्मिरी महिला वैमानिक होत्या. त्यांना 1994 मध्ये CPL कमर्शिल पायलट लायसन मिळाले होते. त्या 2004 मध्ये पहिल्या काश्मिरी महिला वैमानिक झाल्या. पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.

GreaterkashmirPost | ArchivedLink
त्यानंतर आम्ही गुगलवर ‘iram habib became a pilot’ या शब्दांनी शोध घेतला. त्यावेळी आमच्यासमोर खाली रिझल्ट झाला.

टाईम्स ऑफ इंडियाने 31 ऑगस्ट 2018 रोजी दिलेल्या वृत्तात इरम हबीब ही पहिली काश्मिरी मुस्लीम महिला पायलट असल्याचे म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.

TimesofindiaPost | ArchivedLink
‘GreaterKashmir’ ने 20 ऑक्टोबर 2018 रोजी यावर पहिली महिला पायलट कोण आहे, याबाबत खुलासा केल्याचे दिसून येत आहे.

GreaterkashmirPost | ArchivedLink
निष्कर्ष
इरम हबीब या पहिल्या काश्मिरी महिला वैमानिक नसून सामी आरा या पहिल्या काश्मिरी महिला वैमानिक आहेत. सामी आरा या 2004 मध्ये वैमानिक झाल्या आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:तथ्य पडताळणी : काश्मीरमधील पहिली महिला वैमानिक कोण?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
