
वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याची शक्यता, MIM म्हणतंय आता लोकसभा लढवायची अशा शीर्षकाचे वृत्त www.frontpage.ind.in या संकेतस्थळाने दिले आहे. औरंगाबादसह राज्यातील दोन ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत MIM आग्रही आहे. औरंगाबादेतून बी. जे. कोळसे पाटील यांच्या नावाला MIM ने विरोध केला आहे, असे वृत्त या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
डेली हंटनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तात वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एमआयएमच्या नाराजीने ही फुट पडू शकते, असे या वृत्तात म्हटले आहे.

थोडक्यात या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही वंचित बहुजन आघाडीत फूट पडण्याची चिन्ह दिसत आहे, असे म्हटले आहे.

प्रहारनेही कोळसे पाटील यांच्या उमेदवारीवरून एमआयएम आक्रमक झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याची शक्यता प्रहारने वर्तवली आहे. आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी द्या अशी मागणी पुढे आली आहे, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

या संकेतस्थळांनी वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याची शक्यता असल्याचे म्हटलंय. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या.


निष्कर्ष
वंचित बहुजन आघाडीमध्ये फुट पडण्याची शक्यता असल्याचे वृत्त www.frontpage.ind.in या संकेतस्थळाने कोणत्या आधारे दिले हे समजू शकलेले नाही. फॅक्ट क्रिसेंडोने प्रकाश आंबेडकर, आमदार इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याचा इन्कार केला आहे. आघाडीत फूट पडण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Title:सत्य पडताळणी: वंचित बहुजन आघाडीत फुट पडण्याची शक्यता?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
