
भाजप नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मृत्यू त्यांनी गोमांस विक्रीला परवानगी दिल्याने झाल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
भाजप नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मृत्यू त्यांनी गोमांस विक्रीला परवानगी दिल्याने झाला असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले का? याचा शोध घेत असताना आम्हाला त्यांनी केलेले खालील वादग्रस्त वक्तव्य दिसून आले.
या विधानानंतर भाजपने त्यांच्या या विधानाशी असहमती दर्शविल्याचे वृत्त एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनीही याबाबत नंतर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करत ‘होय, मी बाबरी मशीद पाडली आणि त्याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य केले. दैनिक सकाळने 21 एप्रिल 2019 रोजी याबाबतचे एक वृत्त प्रसिध्द केले आहे.

याआधीही त्यांनी औरंगाबाद येथे देशभक्तीसाठी मुलं जन्माला घाला, संगोपन आम्ही करु असे विधान केले होते. झी 24 तासने याबाबतचे वृत्त दिले होते.

दिग्विजय सिंह यांच्याबद्दलही साध्वी प्रज्ञा सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे दिसून येते. दैनिक लोकमतने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे.

निष्कर्ष
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी वेळोवेळी विविध वादग्रस्त विधाने केल्याचे दिसून येते. भाजप नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मृत्यू गोमांस विक्रीला परवानगी दिल्याने झाल्याचे वक्तव्य मात्र त्यांनी केलेले नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळून आले आहे.

Title:तथ्य पडताळणी : साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, पर्रिकरांचा मृत्यू गोमांस विक्रीला परवानगी दिल्याने
Fact Check By: Dattatray GholapResult: False
