सोशल मीडियावर विविध राजकीय नेत्यांचा उल्लेख करत त्यांच्या भाऊ-बहिण किंवा अपत्य यांची संख्या दाखवणारी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, प्रवीण तोगडिया, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे या नेत्यांची नावे वापरून त्यांच्या नावासमोर भाऊ-बहिण आणि अपत्य याची संख्या दिली आहे. फॅक्ट क्रिसेंडोने केली यापोस्ट संदर्भात सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

या पोस्टमध्ये काही नेत्यांची फोटो देण्यात आले असून, त्यांच्या नावासमोर भाऊ-बहिण, अपत्य याची संख्या लिहिण्यात आलेली आहे. पोस्टमध्ये देण्यात आलेल्या नेत्यांची खरेच असे नातेवाईक आहेत का?

  • 1.पंतप्रधान नरेंद्र मोदी = 07 भाई बेहेन
  • 2. उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ = 6 भाई बेहेन
  • 3. भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी = 8 भाई बेहेन
  • 4. आंतरराष्ट्रीय हिंदू परीषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया = 9 भाई बेहेन
  • 5. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव = 10 बच्चे
  • 6. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे = 11 भाई बेहेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती 07 बहिण – भाऊ आहेत का?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण किती बहिण-भाऊ आहेत हे आम्ही गुगलवर शोधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण 5 भाऊ-बहिण आहेत. त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्या नंबरचे आहेत. इंडिया टुडे या वृत्तपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती बहिण-भाऊ आहेत याबद्दल सविस्तर बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण मोदी परिवाराविषयी सविस्तर माहिती दिली असून, नरेंद्र मोदींच्या वडीलांच्या काळातील वंशावळ देण्यात आली आहे. तसेच डेली ओ इंग्रजी वृत्तपत्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5 भाऊ-बहिण आहेत असे म्हटले आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावासमोरचा मजकूर असत्य आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण संपुर्ण माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबियांची वशांवळअर्काईव्ह

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 6 बहिण-भाऊ आहेत का?

पूर्वी उत्तर प्रदेशात असणारे, पण (आता उत्तराखंड) असलेले यमकेश्वर तहसील अंतर्गत पंचूर गावातील गढवाली राजपूत परिवारात योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव अजय सिंह बिष्ट असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव आनंद सिंह असे आहे. ते, त्या परिसरातील निवृत्त वनरक्षक आहेत. योगींच्या आईचे नाव सावित्रीदेवी आहे. आनंद सिंह यांना एकूण सात अपत्य आहेत. त्यापैकी योगी आदित्यनाथ हे त्यांचे पाचवे अपत्य आहे. योगी आदित्यनाथ यांना तीन मोठ्या बहिणी असून, एक मोठा भाऊ आहे, तर दोन छोटे भाऊ आहेत.

आज तकअर्काईव्ह

युटयूबवर एबीपी न्यूज या चॅनलवर 18 मार्च 2017 रोजी अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये 12.18 मिनीटापासून ते 12.25 मिनीटांपर्यंत योगी आदित्यनाथ यांना पकडून एकूण सात बहिण-भाऊ आहेत. म्हणजेच योगी आदित्यनाथ यांना वगळले तर त्यांना एकूण 6 बहिण-भाऊ आहेत हे सत्य आहे.

https://www.youtube.com/watch?v=rvbRUYzGYfU

लालकृष्ण आडवाणी यांना 8 बहिण-भाऊ आहेत का?

भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना केवळ एक बहिण आहे. शीला आडवाणी या त्यांच्या बहिण आहेत. इंडिया टीव्ही या वृत्तपत्राच्या बातमीमध्ये लालकृष्ण आडवाणी आणि शीला आडवाणी यांचा एक लहानपणीचा फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याशिवाय फेमस पीपल या वेबसाईटवर देखील लालकृष्ण आडवाणी यांना एक बहिण असून त्यांचे नाव शीला आडवाणी आहे.

नोटेडनेम्सअर्काईव्ह

इंडिया टीव्हीअर्काईव्ह

युट्युबवर टॅटीव्ह टीके या चॅनलवर लालकृष्ण आडवाणी यांच्या 91 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या बहिणीने शीला आडवाणी यांनी मिठाई खावू घालतानाचा फोटो 2.34 मिनीटांपासून ते 2.40 मिनीटांपर्यंत आपण तो फोटो पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=WG9CEoH65hA

प्रवीण तोगडिया यांना 9 बहिण-भाऊ आहेत का?

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना एकही सख्खी बहिण-भाऊ नाही. त्यांच्या विषयी गुगलवर सर्च केले असता प्रवीण तोगडिया यांना चुलत भाऊ होता. त्यांचा खून 2016 मध्ये सुरत येथे झाला होता. त्यामुळे प्रवीण तोगडिया यांच्या विकिपीडियामध्येही कोणताही भाऊ-बहिण असल्याचे माहिती देण्यात आलेली नाही. स्टार्सअनफोल्डेड या वेबसाईटवर प्रवीण तोगडिया यांची सर्व माहिती देण्यात आली असून, त्यामध्येही प्रवीण तोगडिया यांना सख्खे बहिण-भाऊ आहेत याविषयीची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवीण तोगडिया यांना एकही सख्खे बहिण-भाऊ नाही. म्हणून पोस्टमध्ये देण्यात आलेली प्रवीण तोगडिया यांना 9 बहिण-भाऊ ही माहिती खोटी आहे.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना 10 अपत्य आहेत का?

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हे एकूण 08 अपत्यांचे वडिल होते. त्यांना 03 मुले आणि 05 मुली आहेत. याबद्दलची माहिती पी.एम.इंडिया या ऑफिशिअल वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्यामुळे पोस्टमध्ये देण्यात आलेली पी.व्ही. नरसिंहराव यांच्याविषयीची माहिती असत्य आहे.

पी.एम.इंडियाअर्काईव्ह

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना 11 बहिण-भाऊ होते का?

स्व. बाळासाहेब ठाकरे यांना एकूण किती बहिण-भाऊ आहेत याविषयी गुगलवर सर्च केले असता, वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वेगवेगळी माहिती समोर आली. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना एकूण 5 बहिणी आणि दोन भाऊ होते अशी माहिती समोर येते.

  • 5 बहिणी

संजीवनी करंदीकर, पमा टिपणीस, सुशिला गुप्ते, सुधा सुळे, सरला गडकरी.

  • 2 भाऊ

रमेश ठाकरे, श्रीकांत ठाकरे

गुगलअर्काईव्ह

बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही प्रबोधनकार ठाकरे डॉट ओआरजी या वेबसाईटला भेट दिली. या वेबसाईटवर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांना एकूण 10 अपत्य होती असे म्हटले आहे. त्यापैकी चार मुलगे आणि सहा मुली असे या वेबसाईटवर लिहिलेले आहे.

प्रबोधनकार.ओआरजीअर्काईव्ह

इंडिया टीव्ही या वेबसाईटवर बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी कौटुंबिक माहितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना केवळ एकच भाऊ होता अशी माहिती समोर येते.

India TV l अर्काईव्ह

बाळासाहेब यांना एकूण किती बहिण-भाऊ होते याविषयी वेगवेगऴ्या वेबसाईटवर वेगवेगऴी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे यांच्या वेबसाईटच्या आधारे बाळासाहेब ठाकरे यांना 09 बहिण-भाऊ होते. त्यामुळे पोस्टमध्ये देण्यात आलेला स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयीचा मजकूर असत्य आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या नेत्यांच्या नावासमोरची माहिती ही असत्य स्वरुपाची आहे. कारण पोस्टमध्ये दाखविण्यात आलेले नेत्यांच्या नावांपैकी केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलचा मजकूर सत्य असून, बाकी सर्व नेत्यांविषयीचा मजकूर हा असत्य आहे. म्हणूनच पोस्टमधील तथ्य असत्य आहे.

Avatar

Title:या नेत्यांबाबत करण्यात आलेले दावे खरे आहेत का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale

Result: False