सत्य पडताळणी : MIM ला ‘खुदा हाफिज़’ म्हणत आमदार इम्तियाज़ जलील उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

False राजकीय | Political

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील एमआयएम पक्षाला आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांना खुदा हाफिज़ म्हणत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याचे वृत्त http://dilligatenews.com या संकेतस्थळाने दिले आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यात व आमदार इम्तियाज जलील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा एमआयएमच्या गोटात सुरू आहे. असे या वृत्तात म्हटले आहे. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून आतापर्यंत ‘एमआयएम’ने उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी आमदार इम्तियाज जलील खासदारकीच्या फडात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, असे महाराष्ट्र टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 

आक्राईव्ह लिंक

‘लोकसत्ता’ने औरंगाबादच्या जागेवरून ‘एमआयएम’मध्ये मतभेद अशा शीर्षकाचे वृत्त प्रसिध्द केले आहे. औरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढविली नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पूर्णत: विस्कळीत होईल, असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटल्याचे या वृत्तात नमूद केले आहे. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढविण्याबाबतचा रेटा असल्याची माहिती ओवेसी यांना जलील यांनी दिली आहे.

आक्राईव्ह लिंक

ट्विटरवरही आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी चर्चा रंगली होती.

आमदार इम्तियाज जलील यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या फेसबुक पेजवर खालील पोस्ट केली आहे.

आक्राईव्ह लिंक

या खुलाशाद्वारे आमदार इम्तियाज जलील यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आपल्यात मतभेद निर्माण व्हावेत म्हणून काही घटक काम करत असल्याचा आरोपही त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. पक्षनेतृत्वाचा निर्णय आपल्यावर बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आपण पक्षाबरोबरच असल्याचे त्यांनी या निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे. आमदार इम्तियाज जलील यांचे हे फेसबुक अकाऊंट व्हेरिफाईड नसल्याने आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे आपलेच अकाऊंट असल्याचे सांगितले. पक्षाशी आपण एकनिष्ठ असून पक्षाने दिलेला आदेश आपण पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निष्कर्ष

दिल्ली गेट न्यूज या संकेतस्थळाने आपल्या वृत्तात त्यांनी आमदार इम्तियाज जलील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा असल्याचे म्हटले आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यात व आमदार इम्तियाज जलील यांच्यात मतभेद झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. आमदार इम्तियाज जलील यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी पक्षनेतृत्वावर देखील विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे हे वृत्त असत्य असल्याचे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत दिसून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : MIM ला ‘खुदा हाफिज़’ म्हणत आमदार इम्तियाज़ जलील उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False