
मुस्लिमांचा उद्देश केवळ भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून देणे एवढा नाही तर संपूर्ण जगावर इस्लामची हुकूमत स्थापित करणे हा आहे, अशी एक पोस्ट सध्या मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी असे काय वक्तव्य केले आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने पसरविण्यात येणाऱ्या या माहितीत किती तथ्य आहे, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांनी वेळोवेळी काय विधाने केली याचा देखील आम्ही शोध घेतला. तेव्हा satyagrah.scroll.in या संकेतस्थळावरील एक लेख आम्हाला दिसून आला. या लेखात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अबुल कलाम आझाद यांच्याबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियात काय लिहिले आहे, याचा उल्लेख करण्यात आला आहे.
नेहरूंनी ‘मौलाना आज़ाद का नज़रिया विस्तृत और तर्कसंगत था और इसकी वजह से न तो उनमें सामंतवाद था और न संकरी धार्मिकता और न ही सांप्रदायिक अलहदगी’ असे या पुस्तकात म्हटले आहे.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचा हिंदू-मुस्लिम एकतेवर विश्वास होता आणि त्यांनी म्हटलेले एक प्रसिध्द वाक्य आम्हाला bharatdiscovery.org या संकेतस्थळावर दिसून आले. ते खालील प्रमाणे आहे.
मौलाना अबुल कलाम आझाद पाकिस्तानच्या निर्मितीच्या विरोधात होते आणि रामगड येथील काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली होती.
मौलाना अबुल कलाम आझाद हे अल-हिलाल हे वृत्तपत्र चालवत होते. याबाबतचा उद्देश त्यांनी सांगितला आहे. ते नेमके काय म्हणाले हे आपण खाली वाचू शकतो. बीबीसीने आपल्या एका लेखात याचा उल्लेख केला आहे.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी मुस्लिमांना काय आवाहन केले होते. याचा उल्लेखही बीबीसीच्या या लेखात सापडतो.
मौलाना अबुल कलाम आझादांनी केलेली विविध विधाने खाली दिलेल्या पीडीएफ फाईलमध्ये पाहू शकतात. यात कुठेही पोस्टमध्ये दिलेले विधान दिसून येत नाही.
https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/92054/10/10_chapter%205.pdf
निष्कर्ष
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केलेली विधाने अभ्यासली असता त्यांनी मुस्लिमांचा उद्देश केवळ भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून देणे एवढा नाही तर संपूर्ण जगावर इस्लामची हुकूमत स्थापित करणे हा आहे, असे म्हटलेले आढळत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Title:तथ्य पडताळणी : मौलाना अबुल कलाम आझादांबद्दल पसरविण्यात येणारी ही पोस्ट किती सत्य?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
