(छायाचित्र सौजन्य : livemint )

महा-राजकारण या फेसबुक पेजवरुन सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांनी हिंदुस्थान मे रेहना होगा, तो अल्लाह हु अकबर कहना होगा असे म्हटल्याचा दावा करण्यात येत आहे. या पोस्टमध्ये शेहला रशीद, उमर खालिद, कन्हैय्या कुमार यांनीही काही वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

जिग्नेश मेवानी यांनी खरोखरच असे वक्तव्य केले आहे का याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. टाईम्सनाऊन्यूज.कॉम याबाबत आम्हाला एक वृत्त आढळून आले. या वृत्तात जिग्नेश मेवानी यांनी नागरिकांना अल्लाह हू अकबरचा म्हणण्यास सांगितल्याचे म्हटले आहे. अमित मालवेय यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्याचे टाईम्सनाऊन्यूज.कॉम म्हटले आहे. या व्हिडिओची सत्यता आम्ही पडताळू शकत नसल्याचेही या संकेतस्थळाने म्हटले आहे. या व्हिडिओत कुठेही जिग्नेश मेवानी यांनी हिंदुस्थान मे रेहना होगा, तो अल्लाह हु अकबर कहना होगा असे म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

इंडिया टीव्ही आणि झी न्यूजनेही याबाबतचे वृत्त अमित मालवीय यांच्या व्हिडिओच्या आधारे दिले आहे. या व्हिडिओमध्येही जिग्नेश मेवानी यांनी हिंदुस्थान मे रेहना होगा, तो अल्लाह हु अकबर कहना होगा असे म्हटलेले आढळत नाही. एबीपी न्यूजचे विकास भदोरिया यांनीही एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्येही हाच व्हिडिओ दिसत आहे. यात जिग्नेश मी 5 वेळा जय श्रीराम म्हणतो तुम्ही अल्लाह हु अकबर असे म्हणा, असे सांगतोय पण पोस्टमध्ये दावा केलेले वक्तव्य त्यांनी केलेले आढळून येत नाही.

आक्राईव्ह लिंक

शेहला रशीद हिने तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा अशा घोषणा दिल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. याबाबीची पडताळणी करताना आम्ही न्यूज 18 च्या संकेतस्थळावर गेलो. या ठिकाणी शेहला रशीद हिने घोषणा दिल्याचा पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

उमर खालिद याने भारत तेरे तुकडे होगे, इंशा अल्लाह, इंशा अल्लाह अशा घोषणा दिल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. याबाबत पडताळणी करताना आम्ही डीएनए या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर पोहचलो. याठिकाणी उमर खालिदवर असा आरोप असून याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

कन्हैय्या कुमार याने भारतीय सेना के जवान महिलाओ का बलात्कार करते है, असे म्हटल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याची तथ्य पडताळणी करताना इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर खालील वृत्त दिसले. यानुसार कन्हैय्या कुमारने असे वक्तव्य केल्याचे दिसून येत आहे. उमर खालिद

आक्राईव्ह लिंक

कन्हैय्या कुमारने काश्मीरमध्ये भारतीय जवान बलात्कार करत असल्याचे वक्तव्य केले असल्याचे दिसते पण भारतीय सैन्याची सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमता नसल्याचे वक्तव्य केलेले आढळत नाही.

निष्कर्ष

जिग्नेश मेवानीने हिंदुस्थान मे रेहना होगा, तो अल्लाह हु अकबर कहना होगा असे म्हटले असल्याचे कुठेही सिध्द होत नाही. शेहला रशीद हिने तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा अशा घोषणा दिल्याचे पुरेसे पुरावा उपलब्ध नसल्याचे याबाबतच्या आरोपपत्रात म्हटले आहे. उमर खालिद याने भारत तेरे तुकडे होगे, इंशा अल्लाह, इंशा अल्लाह अशा घोषणा दिल्याचा आरोप आहे. कन्हैय्या कुमार भारतीय जवान काश्मीरात महिलावर बलात्कार करतात, असा आरोप केल्याचे दिसून येत आहे. भारतीय सैन्याची सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमता नसल्याचे वक्तव्य कन्हैय्या कुमारने केल्याचे कुठेही आढळून येत नाही. सध्या या पोस्टमध्ये देण्यात आलेल्या अनेक बाबी या न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : जिग्नेश मेवानी, कन्हैय्या कुमार यांनी खरंच असं विधान केलं होतं का?

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False