मुस्लिम गुंडाने केला धनगर तरुणाचा खून; परतुरात तणाव अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. नागरी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

परतूरमध्ये सध्या खरंच असा काय तणाव आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही परतूरचे पोलिस उपनिरीक्षक एम. आय. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही तणाव सध्या नसल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही मग ही पोस्ट कशी आली याचा शोध सुरु केला. मुस्लिम गुंडाने केला धनगर तरुणाचा खून; परतुरात तणाव या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर थेट दैनिक सामनाचा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना कधीची आहे याचा कोणताही उल्लेख या पोस्टच्या शीर्षकावरुन कळत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा दैनिक सामनामध्ये असे वृत्त मे 2019 मध्ये प्रसिध्द झाले आहे का? हे तपासले. तेव्हा असे वृत्त मे 2019 महिन्यात प्रसिध्द झाल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर हे वृत्त जुने आहे का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला हे वृत्त दैनिक सामनाने 9 ऑक्टोबर 2018 रोजी दैनिक सामनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्याचे दिसून आले.

अक्राईव्ह

दैनिक सामनाने प्रसिध्द केलेले हे वृत्त आणखी कोणी प्रसिध्द केले आहे का? याची पडताळणी केली असता आम्हाला डेली हंटने दैनिक सामनाचे हे मुळ वृत्त प्रसारित केले असल्याचे दिसून येत आहे.

अक्राईव्ह

दैनिक लोकमतनेही या घटनेबाबत वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तात मुलीची छेड; संशयातून मारहाणीत एकाचा मृत्यू असे म्हटले आहे.

अक्राईव्ह

या दोन्ही वृत्तात तफावत आढळत असल्याने या दोन्ही बातम्या नीट वाचल्यास या प्रकरणात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्याचे दिसून येते. तुकाराम आढाव खून प्रकरणातील आरोपींचा भाऊ शेख मुजीब शेख जमीर यानेही पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले असून, तुकाराम आढाव व त्याच्या दोन मित्रांनी माझ्या बहिणीची छेड काढली होती. या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यातील तुकाराम आढाव व सत्या या दोघांना ७ रोजी पोलीस ठाण्यात हजर केले होते. त्याची सीसीटीव्हीमध्ये नोंद असून, तुकाराम आढाव याच्या मृत्यूस आरोपी जबाबदार नाही, असे म्हटले असल्याचे दैनिक सामनाच्या वृत्तात शेवटी नमूद करण्यात आलेले आहे.

दैनिक पुढारीनेही या घटनेबद्दलचे सविस्तर वृत्त जालना आवृत्तीत दिले आहे. या वृत्तात या घटनेतील परस्परविरोधी तक्रारीही दिल्या आहेत.

अक्राईव्ह

अक्राईव्ह

निष्कर्ष

परतुर येथे खून झाल्याची ही घटना जुनी आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये ही घटना जुनी असल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे ही घटना ताजी असल्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : तरुणाच्या खूनामुळे खरंच तणाव पसरलाय का?

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False