गर्दी न जमल्यामुळे अमित शाह यांची गडचिरोलीतील सभा रद्द झाली का? : सत्य पडताळणी

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे की, गर्दी कमी असल्यामुळे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची गडचिरोली येथील सभा रद्द झाली आहे. याबद्दल फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत फेसबुकवर भाजपला पळवा महाराष्ट्राला वाचवा या पेजवरुन ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट 280 वेळा शेअर, 658 लाईक्स आणि 35 कमेंटस् मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह  

सत्य पडताळणी

सोशल मीडियवर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची चंद्रपूर येथील सभा गर्दी न जमल्यामुळे रद्द करण्यात आली असे म्हटले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप लोकसभा उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ 7 एप्रिल 2019 रोजी अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर आणि गडचिरोली येथील प्रचार सभेसंदर्भात जाणून घेण्यासाठी अमित शाह यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर सर्च केले. 07 एप्रिल 2019 रोजी अमित शाह यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आल्याचे वृत्त खरे आहे.

ट्विटर

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात गुगलवर अमित शाह चंद्रपूर सभा रद्द असे टाईप केले. त्यानंतर विविध वृत्तपत्रांमध्ये या विषयावर बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.

लोकमतअर्काईव्ह

झी 24 तासअर्काईव्ह

लोकमत न्यूज 18अर्काईव्ह

डीएनएअर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये गर्दी नसल्यामुळे अमित शाह यांची सभा रद्द हे कारण देण्यात आले आहे. परंतू टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीमध्ये गडचिरोली येथे लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती असे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील देण्यात आलेले कारण खोटे आहे.

टाईम्स ऑफ इंडियाअर्काईव्ह

07 एप्रिल 2017 रोजी जेव्हा गडचिरोली आणि चंद्रपूर येथील सभेला जेव्हा अमित शाह हे उपस्थित राहू शकणार नाही हे आयोजकांना कळल्यावर सभेसाठी उपस्थित लोकांसाठी भाजप नेते ऐनवेळी सुधीर मुनगंटीवर यांनी लोकांसोबत सभेमध्ये भाषण केले. त्यानंतर त्यांनी स्वतः सभेसाठी उपस्थित असणारी लोकांचा फोटो स्वतःच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर टाकला आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण फोटो बघू शकता.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची गडचिरोली आणि चंद्रपूर सभा रद्द संदर्भात फॅक्ट क्रिसेंडो टीमने चंद्रपूर येथील हंसराज अहिर यांच्या भाजप प्रचार कार्यालयाशी फोनवर संपर्क केला असता, कार्यालयातून सतीश जोशी यांनी अमित शाह यांच्या हेलीकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे ते गडचिरोली आणि चंद्रपूर येथील प्रचार सभांना येवू शकले नाहीत असे सांगितले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात संपुर्ण संशोधनाअंती असे आढळले आहे की, 07 एप्रिल 2019 रोजी गडचिरोली आणि चंद्रपूर येथील भाजप प्रचार सभेसाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणाने येवू शकले नाहीत.

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट गर्दी न जमल्यामुळे अमित शाह यांची चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सभा रद्द हे तथ्य खोटे आहे. अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते सभेला पोहोचू शकले नाहीत, म्हणून शाह यांची सभेमध्ये उपस्थिती नव्हती. सभेसाठी लोकांची गर्दी होती.

Avatar

Title:गर्दी न जमल्यामुळे अमित शाह यांची गडचिरोलीतील सभा रद्द झाली का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False