
एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 54 जागा दाखवल्या असून हे बघून बंगालमध्ये लोक जाम हसत आहेत. ज्या बंगालमध्ये लोकसभेच्या फक्त #42 seat आहेत तिथे bjp #53 जागांवर विजयी दाखवलीय, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
एबीपी न्यूजने खरंच असे एक्झिट पोल घेतला आहे का आणि त्यातील ग्राफिकमध्ये पश्चिम बंगालमध्ये 54 सीट आहेत असे म्हटले आहे का? हे पाण्यासाठी आम्ही एबीपी न्यूजच्या संकेतस्थळावर गेलो त्याठिकाणी आम्हाला खालील वृत्त आणि ग्राफिक दिसून आले.
(एबीपी न्यूजच्या संकेतस्थळावर असलेले मूळ ग्राफ्रिक)
खाली हे ग्राफ्रिक आपण तुलनात्मकरित्या पाहू शकता.
यातुन ग्राफिकमध्ये बदल करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
एबीपी न्यूजने एक्झिट पोलमध्ये नेमके काय म्हटले आहे, हे खाली दिलेल्या वृत्तात दिसून येत आहे.
निष्कर्ष
एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने आपल्या एक्झिट पोलमध्ये कुठेही पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 54 जागा असल्याचे म्हटलेले नाही. त्यांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा दाखवल्या आहेत. भाजपला 53 नव्हे तर 16 जागा दाखवल्या आहेत. टीएमसीला 0 नव्हे तर 24 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसला 01 नव्हे तर 02 जागा दाखवल्या आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:तथ्य पडताळणी : एबीपीने पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 54 जागा दाखवल्या आहेत का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
