पुलवामा हल्ला भाजपने विचारपूर्वक रचलेला कट होता. पाकिस्तानवर खोटा हल्ला करण्यात आला आणि मोदींना निवडणूक जिंकण्यासाठी इम्रान खान मदत करत आहे. बालाकोट येथे इम्रान खानच्या सहमतीनेच बॉम्ब हल्ले करण्यात आले, असे वक्तव्य विंग कमांडर अभिनंदन यांनी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही अभिनंदन यांनी असे काही वक्तव्य केले आहे का, याचा शोध घेतला त्यावेळी आम्हाला असे कोणतेही वक्तव्य आढळले नाही. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी मात्र असे वक्तव्य केले असल्याचे न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तात दिसून येते.

अक्राईव्ह

अभिनंदन यांच्याविषयीची सगळ्यात ताजी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये काय आहे, याचीही आम्ही पडताळणी केली त्यावेळी आम्हाला द इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेले खालील वृत्त दिसून आले. या बातमीतही अभिनंदन यांचे असे कोणतेही वक्तव्य नाही.

अक्राईव्ह

त्यानंतर आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे ही बातमी शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला अपेक्षित परिणाम आढळून आला नाही. अभिनंदन या नावाने सर्च केले असता आम्हाला विश्वास न्यूज या हिंदी संकेतस्थळाने केलेले एक फॅक्ट चेक दिसून आले. मग प्रश्न उभा राहिला की हे वृत्तपत्राचे कात्रण आले कुठून? याचा शोध घेण्याचाही आम्ही ठरवले. विविध हिंदी वृत्तपत्रे त्यासाठी आम्ही पाहिली. त्याचवेळी दैनिक जागरणच्या संकेतस्थळावर 18 मे 2019 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. हे वृत्त विश्वासने केलेल्या फॅक्ट चेकचे असून त्यात स्पष्टपणे फेक न्यूज असे म्हटलेले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये कात्रणाचा काही भागच दाखवण्यात येत आहे. ही फेक न्यूज असल्याचे स्पष्ट दिसत नसल्याने अभिनंदनने असे वक्तव्य केल्याचा गैरसमज मात्र पसरत आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

पुलवामा हल्ला भाजपने विचारपूर्वक रचलेला कट होता. पाकिस्तानवर खोटा हल्ला करण्यात आला आणि मोदींना निवडणूक जिंकण्यासाठी इम्रान खान मदत करत आहे. बालाकोट येथे इम्रान खानच्या सहमतीनेच बॉम्ब हल्ले करण्यात आले, असे वक्तव्य विंग कमांडर अभिनंदन यांनी केलेले नाही. विश्वास न्यूज या संकेतस्थळाने याचे फॅक्ट चेक केले होते. दैनिक जागरणने याबाबत प्रसिध्द केलेले वृत्त अर्धवट कापून ते सध्या व्हायरल करण्यात येत आहे. या आधारे अभिनंदनने असे वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : अभिनंदन यांच्या नावाने पसरविण्यात येणाऱ्या या माहितीत किती तथ्य?

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False