काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्त दौऱ्यावर गेले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक मशिदीला भेट देताना डोक्यावर मुस्लिम टोपी घातलेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती. चुकीच्या दाव्यासह बनावट फोटो व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम टोपी घातलेले दिसतात.

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज केल्यावर जस्टिस मिरर या वेबसाईटने 11 फेब्रुवारी 2023 रोजी मूळ फोटो आढळला.

फोटोसोबत माहिती दिली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्जामिया-तुस-सैफियाह ही दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था ‘द सैफी अकादमी’ च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले.

या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती.

पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटरवर आणि फेसबुक पेजवर 10 फेब्रुवारी 2023 रोजी ‘द सैफी अकादमी’ च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटने अनेक फोटो शेअर केले होते.

https://twitter.com/narendramodi/status/1624056366636716033?s=20

मूळ पोस्ट – ट्विटर

मूळ पोस्ट – फेसबुक

इजिप्त दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून रोजी इजिप्तमधील कैरो येथील अल-हकीम या मशिदीला भेट दिली होती. अल-हकीम मशीद इजिप्त कैरो मधील 11 व्या शतकातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळ म्हणून ओळखली जाते.

खालील फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल-हकीम मशिदीला दिलेल्या भेटीचे फोटो पाहू शकतात. या फोटोमध्ये दिखील त्यांनी कुठेच मुस्लिम टोपी घातली नव्हती.

https://twitter.com/PMOIndia/status/1672906513524969472?s=20

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले फोटो बनावट आहे. मूळ फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मशिदीला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती; बनावट फोटो व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Altered