
आतापर्यंत एकाही महिलेला शांतीसाठी नोबेल पुरस्कार मिळालेला नाही, असा दावा असलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
नोबेल पुरस्कार कशासाठी देण्यात येतो आणि शांततेसाठी हा पुरस्कार देण्यात येतो का याचा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा शोध घेतला. त्यावेळी नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो, असे याबाबतच्या माहितीत म्हटले आहे. शांततेसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे अधिकार नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेल्या द नॉर्वेजियन नोबेल कमिटीकडे असल्याचे याबाबतच्या विकीपीडियावर असलेल्या माहितीत म्हटले आहे.
शांततेसाठी आतापर्यंत एकाही महिलेला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही का. याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला विकीपीडियावर आतापर्यंत विविध क्षेत्रात काम केलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त महिलांची यादी दिसून आली. यात शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या महिलांची यादी खालीलप्रमाणे आहे.
नोबेल पुरस्काराच्या अधिकृत संकेतस्थळावरही आम्हाला आतापर्यंत शांततेसाठी पुरस्कार मिळालेल्या महिला दिसून आल्या.
बीबीसी मराठीने 5 ऑक्टोबर 2018 रोजी नोबेल पुरस्कार विजेत्या इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेविरोधात लढणाऱ्या आणि संघर्षग्रस्त आणि युद्धग्रस्त भागामध्ये महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या नादिया मुराद यांच्याविषयी एक वृत्त दिले आहे.
निष्कर्ष
जगभरात विविध संघर्षांना तोंड देत आणि परिस्थितीशी सामना करत शांततेसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक महिलांना आतापर्यंत शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकाही महिलेला शांतीसाठी नोबेल पुरस्कार मिळालेला नाही, हा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Title:Fact Check : शांततेसाठी आतापर्यंत एकाही महिलेला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
