
गंगा नदीत स्नान करणारे अज्ञानी आहेत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केल्याचे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी गंगा नदीत स्नान करणारे अज्ञानी आहेत, असे वक्तव्य केले आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर आझम खान असे टाकून शोध घेतला. त्यावेळी आम्हाला त्यांनी केलेली विविध वादग्रस्त वक्तव्ये दिसून आली.
आझम खान यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केलीत हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी मदरशांत गोडसे, प्रज्ञासिंहसारखे लोक तयार होत नाहीत, असे वक्तव्य केल्याचे आम्हाला दिसून आले. दैनिक सामनाने हे वृत्त प्रसिध्द केल्याचे आम्हाला दिसून आले.
आझम खान यांनी अभिनेत्री जयप्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे वृत्त डेली हंटने दिल्याचेही दिसून येते. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून महिला आयोगानेही स्पष्टीकरण मागितल्याचे म्हटले आहे.
आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्याबद्दल दिलेले स्पष्टीकरण आपण खालील व्हिडिओत पाहू शकता.
त्यानंतर आझम खान हे गंगा नदीबद्दल कधी काय बोललेत का याचा शोध आम्ही घेतला. त्यावेळी आज तक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात त्यांनी मोदींनी बाबरी मशीद बनविल्यास आपणही गंगा स्नान करु असे म्हटले आहे.
आझम खान यांनी गंगा नदीत सापडलेल्या मृतदेहांबद्दल एक वक्तव्य केल्याचेही आम्हाला दिसून आले. एबीपी न्यूजच्या या व्हिडिओत त्यांनी या घटनेबद्दल साक्षी महाराजांना जबाबदार धरले आहे.
निष्कर्ष
आझम खान यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांनी गंगा नदीबद्दलही वक्तव्ये केलेली आहेत. पण त्यांनी गंगेत स्नान करणारे अज्ञानी असे म्हटल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : गंगेत स्नान करणारे अज्ञानी, आझम खान यांचे वक्तव्य?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
