41 कोटी लोकांच्या खात्यात 53 कोटी रुपये पाठवले, असे अमित शहा यांनी विधान केले का?

Coronavirus False राजकीय | Political

गृहमंत्री अमित शहा यांनी ‘आजतक’ या हिंदी वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये अमित शहा यांनी “41 कोटी लोकांच्या खत्यांमध्ये 53 कोटी रुपये पाठवले” असे विधान केल्याचा दावा केला जात आहे. याचाच अर्थ की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 1 रुपये 29 पैस एवढी रक्कम जमा झाली, असे नेटकरी म्हणत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता अमित शहा यांनी 53 कोटी नाही तर, 53 हजार कोटी रुपये म्हटले होते, असे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

‘आजतक’ वाहिनीच्या मुलाखतीच्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिलेले आहे की, “41 करोड़ लोगों के खाते में 53 करोड़ रुपये भेजे गए है – अमित शहा”. यावरून युजरने कॅप्शन दिली की, प्रत्येकाच्या खात्यात 1 रुपये 29 पैस जमा केले.

Amit-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

अमित शहा यांनी खरंच मुलाखतीमध्ये असे काही विधान केले का हे तपासण्यासाठी सदरील मुलाखतीचा संपूर्ण व्हिडियो पाहिला. भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही मुलाखत घेण्यात आली होती. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राकडून आर्थिक मदन न मिळाल्याच्या आरोपाला उत्तर देताना अमित शहा यांनी 41 कोटी लोकांच्या खात्यांमध्ये 53 हजार कोटी रुपये पाठवले असे म्हणाले होते.

पत्रकार अंजना ओम कश्यम 15.50 मिनिटापासून विचारतात की, 

अंजना ओम कश्यप: पश्चिम बंगाल सरकार, ममता बनर्जी, जिन्होंने कहा कि हमें मदद नहीं मिल रही है, अब श्रमिक स्पेशल ट्रेन, हम उस पर एक अलग चर्चा करेंगे, लेकिन उन्होंने लगातार कहा है कि उन्हें कितनी राहत मिलनी चाहिए थी,या राज्यों को मिलना चाहिए था, पंजाब सरकार ने भी शिकायत की है, साथ ही महाराष्ट्र सरकार ने भी ये ही कहा है, जो मतभेद सामने आए हैं, उसके बारे में आप क्या कहेंगे?

यावर अमित शहा पुढील उत्तर देतात,

अमित शाह: मुझे नहीं लगता कि ये बड़े अंतर हैं, 1 लाख 70 हजार करोड़ का गरीब कल्याण पैकेज, और इसके अलावा, 12 हजार करोड़ का एनडीआरएफ फंड भेजा गया था, वित्त मंत्रालय से भी 22 हजार करोड़ भेजा गया था, बहुत सहायता दिया गया है, लेकिन केंद्र सरकार की सीमाएँ हैं | मैं आपको बताऊंगा, कुल 41 करोड़ लोगों को सीधे उनके बैंक खाते में 53 हजार करोड़ रुपये भेजे गए हैं | अब, यह सभी राज्यों में चला गया है, न केवल भाजपा सरकार द्वारा चलाये गये राज्यों में, बंगाल में, पंजाब में भी यह चला गया है, महाराष्ट्र में भी यह चला गया है |

यावरून स्पष्ट होते की, आजतक वाहिनीने मुलाखत प्रसारणादरम्यान “53 हजार कोटी” याऐवजी “53 कोटी” असे लिहिले. ही चूक लक्षात आल्यावर चॅनेलने फेसबुक पेजद्वार याविषयी खुलासा केला. तो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

निष्कर्ष

गृहमंत्री अमित शहा यांनी 41 कोटी लोकांच्या खात्यामध्ये 53 हजार कोटी रुपये पाठवल्याचे विधान केले होते. परंतु, ‘आजतक’ वाहिनीने प्रसारणादरम्यान चुकीने 53 कोटी लिहिले. त्यावरून सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्या.

Avatar

Title:41 कोटी लोकांच्या खात्यात 53 कोटी रुपये पाठवले, असे अमित शहा यांनी विधान केले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False