NEET परीक्षेत पहिले पाच टॉपर मुस्लिम विद्यार्थी आहेत का? वाचा सत्य

False सामाजिक

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (NEET) निकाल नुकताच जाहीर झाला. प्रथमच पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा विक्रमदेखील यावेळी झाली. दोन विद्यार्थ्यांनी 720 गुण मिळवले. परंतु, वयाच्या नियमानुसार शोएब आफताब या विद्यार्थ्याला पहिला रँक घोषित करण्यात आला.

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, NEET परीक्षेत पहिले पाच विद्यार्थी हे मुस्लिम आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. 

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, यंदाच्या नीट परीक्षेत शोएब आफताब, ज़ीशान अशरफ, यासिर हमीद, साजिद महमूद आणि सना मीर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले.

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकअर्काइव्हअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

दाव्याप्रमाणे खरंच नीट परीक्षेतील पहिले पाच टॉपर मुस्लिम आहेत का याचा शोध घेतला. सर्वप्रथम नीट परीक्षेची मेरीट लिस्ट तपासली. त्यात या मुलांची नावे आहेत का ते पाहू.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 16 ऑक्टोबर रोजी ट्विटरवर नीट परीक्षेचा निकाल घोषित करताना पहिल्या 50 (Top 50) विद्यार्थ्यांची यादीसुद्धा शेयर केली होती. यादीचे नीट वाचन केले असता कळाले की, यामध्ये पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये शोएब आफताब याचा अपवाद वगळता इतरांची नावे नाहीत.

संपूर्ण यादी येथे पाहा – TwitterArchive

नीट परीक्षेच्या अधिकृत मेरिट लिस्टनुसार, पहिल्या पाच विद्यार्थ्यांची नावे अशी आहेत:

1. शोएब आफताब (720 गुण)

2. आकांक्षा सिंग (720 गुण)

3. तुम्माला स्निकिता (715 गुण)

4. विनीत शर्मा (715 गुण)

5. अमरीशा खेतान (715 गुण)

विशेष म्हणजे संपूर्ण 50 नावांमध्येसुद्धा शोएब सोडून कोणाचीही नावे नाहीत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, यंदाच्या नीट परीक्षेत पहिले पाचही टॉपर मुस्लिम विद्यार्थी नाहीत. सोशल मीडियावर केला जाणारा दावा असत्य आहे.

Avatar

Title:NEET परीक्षेत पहिले पाच टॉपर मुस्लिम विद्यार्थी आहेत का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False