
अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक उंच इमारत जळालेल्या आणि नुकसान झालेल्या अवस्थेत दिसते.
दावा केला जात आहे की ही इमारत बुर्ज खलिफा आहे आणि तिच्यावर 1800 मिसाईल्सने हल्ला करण्यात आला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ खरा नसून एआयद्वारे तयार केलेला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये भीषण आग लागून क्षतिग्रस्त झालेली एक इमारत दिसते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर कॅप्शनमध्ये लिहितात की, “जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर 1800 मिसाईल्स डागण्यात आले असून प्रत्येक मिसाईल अचूक लक्ष्यावर लागले आहे, त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर आहे.”
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम असा कोणता हल्ला बुर्ज खलिफावर झाला असता तर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही विश्वासार्ह किंवा अधिकृत मीडिया संस्थेवर अशी बातमी आढळत नाही.
पुढे व्हायरल व्हिडिओमधील दृश्यांची तुलना गुगल स्ट्रीट व्ह्यूवर उपलब्ध बुर्ज खलिफा आणि त्याच्या आसपासच्या परिसराशी केली असता कळाले की, व्हिडिओतील इमारत आणि परिसर दुबईतील खऱ्या बुर्ज खलिफाशी जुळत नाही.

तसेच शेख मोहम्मद बिन राशिद बुलेवार्डवरून दिसणारा बुर्ज खलिफाचा नजारा आणि व्हिडिओतील दृश्य पूर्णपणे वेगळे आहेत.

खालील तुलनात्मक फोटोमध्ये पूर्व आणि पश्चिम दिशेचे दृश्यदेखील जुळताना दिसत नाहीत.

एआय व्हिडिओ
व्हिडिओची तांत्रिक तपासणी करण्यासाठी तो “हाइव मॉडरेशन” या टूलवर तपासण्यात आला. या टूलच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे आणि तो कोणत्याही खऱ्या घटनेशी संबंधित नाही.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे तयार केलेला असून बुर्ज खलिफावर कोणताही मिसाईल हल्ला झालेला नाही. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामवट्विटरयेथे फॉलो करा.)


