मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामनवमीच्या दिवशी मटण खात होते का ? वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

रामनवमीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जेवण करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे रामनवमीच्या दिवशी मटण खात होते.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमध्ये एकनाथ शिंदे मटण खात नसून शकाहारी जेवण जेवत होत.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेवण करताना दिसतात.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहतात की, “रामनवमीला मटण खाणारा नकली #धर्मवीर.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, कर्लीटेल्स या सोशल मीडिया चॅनलवर मुलाखात घेणाऱ्या कामिया जानी यांनी 18 एप्रिल रोजी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जेवणाचा एक व्हिडिओ अपलोड केला होता.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “रामनवमीच्या शुभ दिवशी, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अगदी मनसोक्त व्हेज सावजी जेवणाचा आस्वाद घेतला.”

या ठिकाणी व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे जेवत पदार्थांचे वर्णन करताना सांगतात की, वांग्याचे भरीत, भाजी आणि पातोडी खात आहेत. 

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | अर्काइव्ह

तसेच कर्लीटेल्सने आपल्या वेबसाईटवर या मुलाखतचे वर्णन केले आहे की, राम नवमीच्या दिवशी एकनाथ शिंदे आणि मी (कामिया जानी) महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड गावामध्ये स्थानिक महिलांनी तयार केलेल्या शाकाहारी सावजी मेजवानीचा आस्वाद घेतला. अधिक महिती आपण येथे वाचू शकता.

निष्कर्श

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मटण खात नसून शकाहारी सावजी जेवण जेवत आहेत. भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

Avatar

Title:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामनवमीच्या दिवशी मटण खात होते का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading