नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय कोरोना निर्मूलन टास्क फोर्सच्या नेतेपदी निवड झालेली नाही. वाचा सत्य

Coronavirus False

कोरोना विषाणूने जगभरात एक लाखांपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. या विषाणूला आळा घालण्यासाठी सर्व देश अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. अशातच एक पोस्ट फिरत आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंग्लंड-अमेरिकेसह 18 देशांच्या कोरोना निर्मूलन टास्क फोर्सच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता ही अफवा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये इंग्रजी बातमीचा एक व्हिडियो शेयर करून कॅप्शन दिली की, अमेरिका आणि इंग्लडसह 18 राष्ट्रांना कोरोना निर्मूलनासाठी टास्क फोर्सचे नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची निवड. भारतासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

खरंच अशी निवड करण्यात आली का याचा सर्वप्रथम इंटरनेटवर शोध घेतला. तेव्हा अशी एकही बातमी आढळून आली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवरदेखील अशी काही माहिती उपलब्ध नाही.

कोरोनाचे एवढे मोठे संकट समोर असताना जर खरंच अशा एखाद्या टास्ट फोर्सची निर्मिती करण्यात आली असती आणि त्याच्या प्रमुखपदी नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली असती तर नक्कीच ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, तसे काही दिसून आले नाही. 

मग पोस्टमध्ये ज्या बातमीचा व्हिडियो शेयर केला आहे, तिचा मूळ व्हिडियो युट्यूबवर सापडला. WION या इंग्रजी वृत्तवाहिनीची ही 15 मार्च 2015 रोजीची बातमी आहे. बातमीमध्ये कुठेही पंतप्रधान मोदींची जागतिक टास्क फोर्स समितीवर निवड झाल्याचे म्हटलेले नाही.

काय आहे बातमीत?

सर्वप्रथम वृत्तनिवेदिका म्हणते की, Now India has emerged as a global leader when it comes to this it’s to take charge of the task force to tackle the coronavirus outbreak. Now India has accomplished the feat of organizing a video conference between eight nations in just 48 hours. Prime Minister Modi is the first world leader to have called for a joint action plan between countries to contain the fast-spreading outbreak. All SAARC nations welcomed India’s move saying that they want to work closely with New Delhi to talk out a strategy to combat the deadly disease. 

(मराठी भाषांतरः कोरोनाविरोधातील लढ्यात भारताची कामगिरी जगात सर्वोत्तम ठरली आहे. मागच्या केवळ 48 तासांमध्ये भारताने 8 देशांच्या प्रमुखांसोबत व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राष्ट्रांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी पहिले नेते ठरले आहेत. सार्क राष्ट्रांनी पंतप्रधानांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले असून, भारतासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.)

संदर्भः करोना आपत्तीशी स्वतंत्रपणे न लढता सार्क देशांनी एकत्र यावे, असे नरेंद्र मोदींनी 15 मार्च रोजी आवाहन केले होते. सार्क देशांच्या प्रमुखांच्या या विशेष संवादात श्रीलंका, मालदिव, नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे प्रमुख व प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी कोणतीही टास्क फोर्स स्थापन करण्यात आली नव्हती. नरेंद्र मोदी यांनी ‘आणीबाणी निधी’चा प्रस्ताव सार्क देशांपुढे मांडला आणि या निधीत भारत एक कोटी डॉलर्सचे योगदान देईल, अशी घोषणा केली होती.

वृत्तनिवेदिका पुढे म्हणते की, Praises were not just limited to South Asia leaders. From other parts of the world also reached out to Prime Minister Modi. Among the first to call was British Prime Minister Boris Johnson who discussed coordinated international efforts to tackle the outbreak with Modi. Australian prime minister Scott Morrison lauded Prime Minister Modi’s efforts to organize a G-20 link-up

(मराठी भाषांतरः केवळ दक्षिण आशिया खंडातील राष्ट्रच नाही तर जगातील इतर देशांनीसुद्धा भारताशी संपर्क साधला आहे. यामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदींशी चर्चा करून आंतरराष्ट्रीयस्तरावर सहकार्य करण्याच्या भूमिकेवर जोर दिला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीसुद्धा मोदींची स्तुती केली.)

संदर्भः इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी 12 मार्च रोजी फोनवरून चर्चा केली होती. या संभाषणासंबंधी भारत आणि इंग्लंड सरकारतर्फे अधिकृत माहिती देण्यात आली होती. केंद्रीय पत्र व सूचना मंत्रालयाच्या प्रेसनोटमध्ये या दोघांच्या चर्चेत कुठेही टास्क फोर्सची स्थापना करण्याविषयी चर्चा झाल्याचा उल्लेख नाही.

व्हिडियोमध्ये मग ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या भाषणाची क्लिप दाखवली जाते. यात ते म्हणतात की, जी-20 देशांमध्ये समन्वय साधून एकत्रित येण्यासाठी मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. माझ्या मते ही फार कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलिया याला पूर्णतः सहकार्य करेल. परंतु, जी-20 चे यंदाचे प्रमुखपद असलेल्या सौदी अरेबियावर हे सर्व अवलंबून आहे. याचबरोबर जी-20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकाचे गव्हर्नर यांचीदेखील बैठक होणे गरजेचे आहे.

toi-1.png

संदर्भः स्कॉट मॉरिसन यांनी 15 मार्च रोजी एका पत्रकार परिषदेमध्ये हे विधान केले होते. एका पत्रकाराने त्यांना मोदींच्या प्रस्तावाविषयी विचारले तेव्हा त्यांनी वरील प्रमाणे उत्तर दिले होते. यामध्ये टास्क फोर्स स्थापन करण्याविषयी ते काहीच बोलले नव्हते. नंतर सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली जी-20 देशांच्या अनेक बैठका झाल्या. यामध्येसुद्धा टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली नाही.

निष्कर्षः यावरून सिद्ध होते की, WION या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या बातमीचा विपर्यास करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांची जागतिक कोविड-19 निर्मूलन टास्क फोर्सच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली नाही. ही निव्वळ अफवा आहे. WION हे झी ग्रुपचे इंग्रजी चॅनेल आहे. सुधीर चौधरी या चॅनेलचे संपादक आहेत.

Avatar

Title:नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय कोरोना निर्मूलन टास्क फोर्सच्या नेतेपदी निवड झालेली नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False