घाबरू नका! 29 एप्रिल रोजी पृथ्वी नष्ट होणार नाही. ‘तो’ व्हिडिओ फेक आहे.

False सामाजिक

आधीच जग कोरोना विषाणूमुळे हैराण असून, आता नवीन संकट पुढे येऊन ठाकल्याचे मेसेज व्हायरल होत आहे. येत्या 29 एप्रिलला संपूर्ण जग नष्ट होणार असल्याचा व्हिडियो लोकांमध्ये भीती पसरवित आहे. एक मोठा लघुग्रह (Asteroid) पृथ्वीवर आदळणार असल्यामुळे सजीवसृष्टी नष्ट होईल, अशी चेतावणी या व्हिडियोमध्ये देण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा आढळला.

काय आहे पोस्टमध्ये?

सुमारे 3 मिनिटांच्या व्हिडियोमध्ये पृथ्वीवर 1998 OR2 लघुग्रह कसा आदळणार याचे वर्णन करण्यात आले आहे. युजरने हा व्हिडियो शेयर करीत लिहिले की, “पृथ्वीवर एस्टरोनॉड 39000 प्रतीतास वेगाने आदळणार आहे. आता आपण एक महिना जगणार. वैज्ञानिक चेतावणी.”

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकArchive

युटयूबवरही अशा स्वरूपाचे अनेक व्हिडियो उपलब्ध आहेत.

screenshot-www.youtube.com-2020.03.21-15_36_59.png

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे नीट निरीक्षण केले असता एका ठिकाणी Asteroid Watch असे लिहिलेले दिसून आले. इंटनेटवर याचा शोध घेतला असता कळाले की, हा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेचा (NASA) एक उपक्रम आहे. पृथ्वीजवळून जाणारे धुमकेतू आणि लघुग्रहांचा अभ्यास व त्यांच्यावर नजर ठेवण्याचे काम Asteroid Watch तर्फे करण्यात येते.

या संस्थेने 4 मार्च 2020 रोजी केलेल्या एका ट्विटनुसार 1998 OR2 नावाचा लघूग्रह 29 एप्रिल रोजी पृथ्वीपासून 62 लाख किमी दूरवरुन जाणार आहे. तो पृथ्वीवर आदळणार नाही. ब्रिटनमधील एक्स्प्रेस या दैनिकाने तो पृथ्वीवर आदळण्याबाबत दिलेला इशारा असत्य असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Archive

म्हणजे दैनिक एक्सप्रेसने 3 मार्च 2020 रोजी चुकीची बातमी छापल्यामुळे जगभरात या लघुग्रहाविषयी गैरसमज पसरला. Asteroid Watch ने त्यांची चूक समोर आणल्यानंतर दैनिक एक्स्प्रेसने याबाबत दिलेल्या वृत्तात सुधारणा करीत खुलासा प्रसिद्ध केला.

screenshot-www.express.co.uk-2020.03.21-14_28_41.png

एक्स्प्रेसमधील सविस्तर वृत्त / Archive1 / Archive2

यावरुन स्पष्ट झाले की, ब्रिटनमधील वृत्तपत्राने दिलेल्या असत्य माहितीच्या आधारे भारतीय प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

निष्कर्ष 

पृथ्वीवर 1998 OR2 लघुग्रह आदळणार नसून तो पृथ्वीपासून 62 लाख किमी अंतरावरुन जाणार आहे.  त्यामुळे 29 एप्रिल 2020 रोजी पृथ्वी नष्ट होणार असल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:घाबरू नका! 29 एप्रिल रोजी पृथ्वी नष्ट होणार नाही. ‘तो’ व्हिडिओ फेक आहे.

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False