
दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मौजपूर भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे.
समाजमाध्यमात मात्र एका व्यक्तीची छायाचित्रे पसरवत ही व्यक्ती अनुराग मिश्रा असल्याची माहिती पसरवत येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
दिल्ली पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या अटक केलेल्या युवकाचे नाव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला असता आम्हाला एएनआय या वृत्तसंस्थेने केलेले खालील ट्विट दिसून आले.
त्यानंतर आम्हाला एनडीटीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तातही पोलिसांनी आरोपीचे नाव शाहरुख असल्याचे म्हटले आहे.
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे मुळ वृत्त / Archive
त्यानंतर मग अनुराग मिश्रा यांची फेसबुक खात्यास भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी दिल्ली हिंसाचाराशी संबंधित शाहरुखसोबत आपले नाव जोडणे चूक असल्याचे म्हटले आहे. आपण अशा रितीने चुकीची माहिती पसरविण्याऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निष्कर्ष
दिल्ली हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव शाहरुख असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. अनुराग मिश्रा यांचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:दिल्लीत गोळीबार करणारा युवक अनुराग मिश्रा आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
