उद्धव ठाकरेंवर टीका करणारा हा काँग्रेसचा नेता नाही. तो भाजपचा नेता शिवम त्यागी आहे. वाचा सत्य

False राजकीय | Political

भाजपसोबत युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यामुळे उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडियो सोशल मीडियावर बराच गाजला. हा व्यक्ती काँग्रेसचा नेता अनिल उपाध्याय असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने अनेक वेळा सिद्ध केले आहे की, अनिल उपाध्याय नावाचा कोणताही आमदार/नेता भाजप किंवा काँग्रेसमध्ये नाही. मग या व्हिडियोतील व्यक्ती कोण आहे? चला तर जाणून घेऊया…

काय आहे व्हिडियोमध्ये?

व्हिडियोमधील कथित काँग्रेसचा नेता अनिल उपाध्याय शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवरून टीका करताना लोकांना भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडियोमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, हा व्हिडियो News Views नामक चॅनेलचा आहे. त्यानुसार सर्च केल्यावर युट्यूबवर या नावाचे एक अकाउंट आढळले. या चॅनेलवर 26 नोव्हेंबर 2019 रोजी “Uddhav Thackeray जैसे जयचंदों को टोटल एक्सपोज़ कर दिया” या नावाने अपलोड केलेला खालील व्हिडियो आढळला.  व्हिडियोच्या विवरणामध्ये लिहिले की, हा व्यक्ती शिवम के. त्यागी आहे. तो एक राजकीय विश्लेषक असल्याचे म्हटले आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – YouTube

म्हणजे हा व्यक्ती अनिल उपाध्याय नाही. फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने या शिवम त्यागीशी संपर्क केला होता. त्यावेळी त्याने सांगितले होते की, हा व्हिडियो त्याचाच असून, तो काँग्रेसचा नेता नाही. 

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुकफेसबुक

विविध न्यूज चॅनेलवरील चर्चांमध्ये तो सहभागी होत असतो. त्याच्या फेसबुक पेजवर शेयर केलेल्या पोस्टनुसार तो भाजपचा प्रवक्ता आणि अखिल भारतीय ब्राह्मन जण कल्याण समितीचा तो राष्ट्रीय समन्वयक आहे. न्यूज-18 उर्दू चॅनेलवरील डिबेटमध्ये त्याला भाजपचा नेता म्हटले आहे. 

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारा हा व्यक्ती शिवम त्यागी आहे. तो भाजपशी निगडित आहे. अनिल उपाध्याय नावाचा कोणताही राजकीय नेता कोणत्याही पक्षामध्ये नाही. हे एक काल्पनिक पात्र आहे. 

Avatar

Title:उद्धव ठाकरेंवर टीका करणारा हा काँग्रेसचा नेता नाही. तो भाजपचा नेता शिवम त्यागी आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False