
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 महिन्यापूर्वी उद्घाटन केलेला जामनगर-जुनागढ पुल कोसळला आहे, अशी पोस्ट मुंबईतील प्रविण कोटीयन यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 महिन्यापूर्वी उद्घाटन केलेला जामनगर-जुनागढ पुल कोसळला आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही Jamnagar-Junagarh highway bridge collapse असे गुगलवर टाकले. त्यावेळी खालील परिणाम आमच्यासमोर आला.
त्यानंतर आम्ही देश गुजरात या संकेतस्थळावर गेलो. या वृत्तात देण्यात आलेल्या माहितीनुसार हा पुल राजकोट जिल्ह्यातील जाम कंडोराना येथे बनलेला आहे. हा पुल अचानक कोसळला असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. संदेश या गुजराती वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, हा जुना पुल दुपारच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. दुपारची वेळ असल्याने या पुलावर कोणतीही वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
निष्कर्ष
जामनगर-जुनागढ महामार्गावरील कोसळलेल्या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले नाही. या पुलाला त्यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली ही बाबही असत्य आहे. हा पुल 3 महिन्यात कोसळला नसुन तो खूपच जुना असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : जामनगर-जुनागढ महामार्गावरील कोसळलेल्या पुलाचे मोदींनी उद्घाटन केले होते का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
