जुने आणि असंबंधित फोटो ओडिशातील वणव्याच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

गेल्या दोन आठवड्यांपासून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाला भीषण आग लागलेली आहे. वणव्यामुळे मोठी जंगलहानी झाली. या नैसर्गिक संकटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

खाक झालेले जंगल, जखमी प्राणी आणि आग विझवतानाचे फोटो शेअर करून तक्रार केली जात आहे की, अ‍ॅमेझॉन जंगलातील वणव्याची जेवढा गाजावाजा झाला तेवढा ओडिशातील आगीचा झाला नाही.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून त्यांच्या सत्यतेबाबत विचारणा केली. 

पडताळणीअंती कळाले की, ओडिशातील जंगलाला आग लागली ही बातमी खरी आहे; परंतु, व्हायरल फोटो दुसऱ्या देशांमधील आगीचे जुने फोटो आहेत.

काय आहे दावा?

मूळ फोटो – फेसबुक । अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एक-एक फोटोची गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे पडताळणी केली असता कळाले की, ते ओडिशातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानीतील आगीचे नाहीत.

फोटो क्र. 1

सत्य – काळ्या रंगाच्या या वाघांचा हा फोटो ओडिशामध्ये सध्या लागलेल्या आगीमुळे भाजलेल्या वाघांचा नाही.  हा फोटो ओडिशामध्ये आढळणाऱ्या ‘ब्लॅक टायगर’ नामक प्रकारच्या वाघांचा आहे. माजी वनाधिकारी संदीप त्रिपाठी यांनी गेल्या वर्षी जुन 2020 मध्ये हो फोटो शेअर केला होता. या वाघांना मेलानिस्टिक टायगर्स असेही म्हणतात. यांच्या अंगावर काळा रंग अधिक असतो. 

संदर्भ – स्पुटनिक न्यूज


फोटो क्र. 2

सत्य – आगीवर पाणी टाकणाऱ्या हेलिकॉप्टरचे फोटो अमेरिकेतील आहेत. 2017 साली तेथील लॉस एंजल्स शहर प्रशासनाने वणव्याला रोखण्यासाठी लॉकहिड मार्टिन सायकॉर्स्की कंपनीचे दोन हेलिकॉप्टर खरेदी केले होते. हे त्या हेलिकॉप्टरचे फोटो आहेत.

संदर्भ – Fire Apparatus Magazine 


फोटो क्र. 3

सत्य – सिम्प्लेक्स एअरोस्पेस कंपनीच्या वेबसाईटवर या हेलिकॉप्टरचे अनेक फोटो उपलब्ध आहे. त्यांच्या कॅटलॉगचा हा एक भाग आहे. हा फोटो ओडिशात पेटलेल्या वणव्याचा नाही.

संदर्भ – सिम्प्लेक्स एअरोस्पेस

निष्कर्ष

जुने आणि असंबंधित फोटो ओडिशाच्या सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाला लागलेल्या आगीचे म्हणून फिरत आहेत. ते फोटो ओडिशातील नाहीत. परंतु, ओडिशाच्या जंगलात लागलेल्या आगीला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असून, मोठी वृक्षहानी झाली आहे. 

Avatar

Title:जुने आणि असंबंधित फोटो ओडिशातील वणव्याच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False