
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे नाकातोंडावर मास्क लावण्याची अजिबात गरज नाही म्हणून सांगतायेत, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शकांचे यावर काय मत आहे? असा प्रश्नही यावर अनेक जण उपस्थित करत आहेत. तुकाराम मुंढेंच्या या व्हिडिओची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
https://archive.org/details/tukaram-munde-old-video-before-lockdown
तथ्य पडताळणी
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे नाकातोंडावर मास्क लावण्याची अजिबात गरज नाही, असे वक्तव्य केले आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी न्यूज नागपूर या युटुयुबवरील चॅनलने 16 मार्च 2020 रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत आयुक्त मुंढे मास्क वापराबाबत आणि कोरोनाच्या तत्कालीन स्थितीबाबत माहिती देताना दिसत आहे. हा तोच व्हिडिओ आहे जो सध्या समाजमाध्यमात सध्याचा म्हणून व्हायरल होत आहे.
https://www.youtube.com/watch?v=nwMUsOAK1o
त्यानंतर दैनिक पुण्यनगरीने 11 ऑगस्ट 2020 रोजी प्रकाशित केलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा व्हिडिओ मार्च 2020 मधील असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावेळी असलेल्या दिशानिर्देशानुसार त्यावेळी सुचना करण्यात आल्या होत्या. सध्या तो नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आता जाणीवपूर्वक पसरविला जात असल्याचे मुंढेंनी म्हटले आहे. नागरिकांनी दक्ष राहून नियमांचे पालक करावे, असे आवाहन मुंढे यांनी केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.
नागपुर महापालिकेनेही हा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होऊ लागल्याने खूलासा करत आयुक्त तुकाराम मुढेंचा हा व्हिडिओ जुना असल्याचे आणि नव्या दिशानिर्देशानुसार मास्क बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ सध्याचा नसून जुना आहे. चुकीच्या माहितीसह तो समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे.
निष्कर्ष
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मास्क बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचा जुना व्हिडिओ समाजमाध्यमात असत्य माहितीसह व्हायरल होत आहे.

Title:तुकाराम मुंढेंचा जुना व्हिडिओ व्हायरल, मास्क वापरणे बंधनकारक; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
