बिहारमधील निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून सोशल मीडियावरसुद्धा अपप्रचार सुरू झाला आहे. एक व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, बिहारमध्ये जनतेने भाजपच्या उमेदवाराचे चपलेचा हार घालून स्वागत केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले. हा व्हिडिओ 2018 साली मध्य प्रदेशमधील आहे.

काय आहे दावा?

भाजपचा उमेदवार प्रचार करत असताना एक ज्येष्ठ व्यक्ती त्याच्या गळ्यात चपलेची माळ घालतो. तो उमेदवार मात्र काहीही भाष्य न करता पुढे जातो. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, बिहारमध्ये भाजप नेत्यांचे भव्य स्वागत.

दावा केला जात आहे कि ही घटना बिहारमधील सुरू असलेल्या प्रचारादरम्या घडली आहे. 

Facebook | Archive

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडूण गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा व्हिडिओ तर 2018 पासून ट्विटर आणि युट्यूबवर उपलब्ध आहे.

ANI न्यूज़ एजन्सीने 7 जानेवारी 2018 रोजी हा व्हिडिओ शेयर केला होता. सोबत माहिती दिली की, दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांदरम्यानचा आहे. तेथील धार जिल्ह्याच्या धामनोद गावात ही घटना घडली होती. 

https://www.youtube.com/watch?v=DuOG-VDywR4

लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, NDTV, झी न्युज़, ABP न्युज़ सारख्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी या घटनेची बातमी दिली होती. त्यानुसार, 7 जानेवारी 2018 रोजी धामनोद गावात प्रचार करत असलेले भाजपचे उमेजवार दिनेश शर्मांचा यांच्या गळ्यात चपलेचा हार घालण्यात आला होता.

हार घालणाऱ्या व्यक्तीने माध्यमांना सांगितले होते की, गावात पाण्याची भीषण टंचाई असल्याने एक महिला तक्रार करण्यासाठी गेली होती. उलट तिच्याविरोधातच तक्रार नोंदविण्यात आली होती. तिला अनेक ठाण्यात बोलविण्यात आले. याचा संताप म्हणून त्यांनी शर्मा यांना चपलेचा हार घातला.

Loksatta | Archive

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, मध्य प्रदेशमधील भाजप उमेदवाराला दोन वर्षांपूर्वी चपलेचा हार घालण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या बिहार निवडणुकीतील म्हणून शेयर करण्यात येत आहे. 

Avatar

Title:बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप उमेदवाराला जनेतेने चपलेचा हार घातला का? वाचा सत्य.

Fact Check By: Milina Patil

Result: False