अलिगढ मुस्लीम विद्यापीठाकडून जवानांच्या बलिदानाची खिल्ली; सत्य की असत्य

Education False

पुलवामाच्या घटनेनंतर अलिगढ मुस्लीम विद्यापीठात जल्लोष करण्यात आल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वृत्त खरे आहे का? अलिगढ मुस्लीम विद्यापीठात खरंच अशी घटना घडली आहे का? नेमकं काय अलिगढ मुस्लीम विद्यापीठात घडलं याची पडताळणी फॅक्ट क्रिसेडोने केली आहे.

फेसबुकवर व्हायरल होत असलेली पोस्ट खालील लिंकवर

Facebook l  अर्काइव्ह

Facebook l  अर्काइव्ह लिंक

सविस्तर बातमी आपण खाली दिलेल्या लिंक बघू शकता.

Bimber l  अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर असे काहीही आढळून आलेले नाही. या विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शहीद जवानांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. विद्यापीठात मात्र शहीद जवानांचे बलिदान साजरे करण्यात आलेले नाही. या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये सविस्तर वृत्त प्रसिध्द झाले आहे. बसिम हलाल या विद्यार्थ्यांने ही आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे.

Business Standard l अर्काइव्ह
Indian Express l अर्काइव्ह l
Live Hindustan l अर्काइव्ह l
Aligarh muslim university l अर्काइव्ह

C:\Users\Fact 3\Downloads\basim_hilal_FIR.jpeg
सौजन्य : इंडिया टूडे

बसिम हलाल या विद्यार्थ्याने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शहीद जवानांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्याच्या या कृतीनंतर त्याच्या विरोधात विद्यापीठाने लगेच कारवाई केली. त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच हलाल याला निलंबित करण्यात आले आहे.  

ही घटना सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इंडिया टूडे

निष्कर्ष : अलिगढ मुस्लीम विद्यापीठ साजरे करतो ४० जवानांचे बलिदान हे शीर्षक पूर्णपणे चुकीचे आहे. या विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यामुळे वृत्त खोटे आढळले आहे.

False Title: अलिगढ मुस्लीम विद्यापीठाकडून जवानांच्या बलिदानाची खिल्ली; सत्य की असत्य
Fact Check By: Amruta Kale 
Result: False