हे पाच पदार्थ भारतीय खातात आवडीने पण विदेशात आहे बंदी; सत्य की असत्य

Mixture वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारत हा खवय्यांचा देश आहे, असे म्हटले जाते. काही प्रमाणात हे सत्यही आहे. वैविध्यता हे भारताचं वैशिष्टय आहे. खाद्यपदार्थांच्या बाबतही हे लागू होते. भारतात काही खाद्यपदार्थ मात्र कमालीचे लोकप्रिय असून ते सर्रासपणे भारतीय आवडीने खात असतात. अशाच काही पदार्थावर परदेशात बंदी असल्याचा दावा स्टारमराठी. डॉट इन या संकेतस्थळाने केला आहे. यातील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न फॅक्ट क्रिसेन्डोने केला आहे.

हे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्टारमराठी. डॉट इन / आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

रेड बूल या एनर्जी ड्रिंकवर डेन्मार्क, नॉर्वे, फ्रान्स या देशात वेळोवेळी रेड बूलवर बंदी घालण्यात आली असल्याचे दिसून येते. चेस-न्यूज डॉट आरयू या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. खाली देण्यात आलेल्या लिंकवर ही बातमी सविस्तरपणे वाचू शकता.

चेस-न्यूज डॉट आरयू / आक्राईव्ह लिंक

फ्रान्समध्ये टॉमेटो केचअपवर बंदी असल्याचे स्टारमराठीच्या वृत्तात म्हटले आहे. हे काही अंशी खरे आहे. प्राथमिक शाळांमध्ये अशी बंदी आहे. मेट्रो.को.युके या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे.

हे वृत्त सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मेट्रो.को.युके / अक्राईव्ह लिंक

जेली स्वीट्समध्ये आरोग्यास घातक असे कोंजेक नावाचे रसायन असते. याबाबत ब्रिटन आणि युरोपात जागरुकता दिसून येते, असे स्टारमराठीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. स्कूपवूफ या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. हे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही सविस्तर वाचू शकता.

स्कूपवूफ/अक्राईव्ह लिंक

पाश्चराईज्ड दूधास कॅनडा बंदी आहे असे स्टारमराठीच्या वृत्तात म्हटले आहे. प्रत्यक्षात कॅनडात

अनपाश्चराईज्ड म्हणजेच रॉ मिल्कला बंदी असल्याचे बिझनेस फायनाशयल पोस्ट डॉट कॉमने म्हटले आहे.

खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही ही बातमी सविस्तर वाचू शकता

बिझनेस फायनाशयल पोस्ट डॉट कॉम / आक्राईव्ह लिंक

एशियन हनी म्हणजे आशियाई देशातील विशेषत: चीनमधील मधात मोठ्या प्रमाणावर प्रतिजैवके आणि घातक धातू असल्याने युरोपमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. युरोपमध्ये यावर बंदी असली तरी भारतात हे मध विकले जाते.

फुडसेफ्टी न्यूज डॉट कॉमने याबाबत दिलेले वृत्त आपण खालील लिंकमध्ये सविस्तरपणे वाचू शकता.

फुडसेफ्टी न्यूज डॉट कॉम / आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

भारतात सर्रासपणे खाण्यात येणा-या पदार्थांवर परदेशात बंदी असल्याचे वृत्त अर्धसत्य आहे. रेड बूल या एनर्जी ड्रिंकवर काही देशांमध्ये बंदी आहे. टॉमेटो केचअपवर फ्रान्समध्ये सरसकट बंदी नसून फक्त काही ठिकाणी ही बंदी आहे. जेली स्वीट्स, आशियाई मधाला काही देशांमध्ये बंदी आहे. पाश्चराईज्ड दूधास बंदी असल्याचेही आढळलेले नाही. फॅक्ट क्रिसेन्डो टीमला या वृत्तातील काही भाग अर्धसत्य असल्याचे आढळून आले आहे.

Avatar

Title:हे पाच पदार्थ भारतीय खातात आवडीने पण विदेशात आहे बंदी; सत्य की असत्य

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •