
पुलवामा हल्ल्यानंतर फेसबुकवर जवांनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा करण्यात येत आहे की, ते हुतात्मा जवान आहेत आणि हल्ल्या होण्यापूर्वीचा त्यांचा हा शेवटचा फोटो आहे. गावरानं वादळ नावाच्या फेसबुक पेजने 16 फेब्रुवारी रोजी हा फोटो पोस्ट केला होता. त्यासोबत कॅप्शन लिहिले की, “देशासाठी शाहिद झालेल्या वीर जवानांचा हा शेवटचा दोन तासापूर्वीचा काढलेला फोटो”. या फोटोची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.
गावरानं वादळ फेसबुक- अर्काइव्ह
हा फोटो पडताळणी करेपर्यँत 1240 वेळा शेयर आणि त्याला 6700 पेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत.
सत्य पडताळणी
फॅक्ट क्रेसेंडो या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले असता आढळून आले की, हा फोटो पुलवामा हल्ल्या होण्यापूर्वीपासून विविध वेबसाईटवर हा फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोचा अलिकडेच हुतात्मा झालेल्या जवानांशी काही संबंध नाही. पुलवामा हल्ला 14 फेब्रुवारी रोजी झाला होता.

गुगल प्लस या सोशल मीडिया वेबसाईटवर आदिती बालाजी नावाच्या एका युजरने 26 जानेवारी 2019 रोजी हा फोटो शेयर केला होता. त्याने सोबत कॅप्शन लिहिले की, “आपल्या शांत झोपेची काळजी घेणार्या जवानांना असे शांतपणे झोपताना पाहून बरं वाटतं.”

त्याच्यापूर्वी तनुश्री दासने हा फोटो गुगल प्लसवर शेयर केला होता. परंतु, आता तो काढण्यात आला आहे.
Oino नावाच्या वेबसाईटवरदेखील हा फोटो 27 जानेवारी 2019 रोजी शेयर करण्यात आला होता.

Insta Stalker या वेबासाईवटर पॅरा कमांडो नावाच्या यूजरनेदेखील हाच फोटो 27 जानेवारी 2019 रोजी शेयर करण्यात आला होता.

निष्कर्ष – असत्य (FALSE)
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे सिद्ध होते की, गावरानं वादळ या फेसबुक पेजने शेयर केलेल हा “शाहिद झालेल्या जवानांचा शेवटचा फोटो” नाही. हा फोटो हल्ल्यापूर्वीपासूनच इंटरनेटवर उपलब्ध आहे. या फोटोचा अलिकडेच हुतात्मा झालेल्या जवानांशी काही संबंध नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:हा फोटो हुतात्मा जवानांचा नाही. शेयर करण्यापूर्वी वाचा सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False
