सौदी राजपुत्राने दिली किम कार्देशियनला एका रात्रीसाठी 71 कोटींची ऑफर? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांच्याविषयी फेसबुकवर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. “माझा पेपर” संकेतस्थळाच्या फेसबुक पेजवर 22 फेब्रुवारीला “सौदी राजकुमारच्या या शौकांची नेहमीच होते चर्चा” या मथळ्याखाली एक बातमी शेयर करण्यात आली. यामध्ये सौदी अरेबियाच्या राजपुत्राने अमेरिकची प्रसिद्ध सेलिब्रेटी किम कार्देशियनला एका रात्रीसाठी १० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७१ कोटी रुपयांची ऑफर दिली होती असा दावा केला आहे. याची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे.

ही बातमी येथे वाचा – माझा पेपरअर्काइव्ह

माझा पेपर या पेजवरील या बातमीच्या पोस्टला पडताळणी करेपर्यंत 228 लाईक्स मिळालेल्या होत्या.

माझा पेपर फेसबुक-अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

माझा पेपर संकेतस्थळावरील बातमीमध्ये म्हटले आहे की, किमचा पती कानिए वेस्ट याने 53 दशलक्ष डॉलर्सचे कर्जा फेडण्यासाठी ट्विटरवर मदत मागितली होती. तेव्हा सौदीचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी त्याल आर्थिक मदत करण्याच मान्य केले. “त्याबदल्यात त्याची पत्नी किमला एका रात्रीसाठी प्रिन्सकडे पाठवावे अशी इच्छा व्यक्त केली होती.”

बातमीमध्ये कुठेसुद्धा सदरील पत्रकार परिषद कधी (तारीख) आणि कोठे झाली याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच बातमीत एके ठिकाणी “एका रात्रीसाठी 10 दशलक्ष डॉलर्स (71 कोटी रुपये)” तर दुसर्या ठिकाणी “कर्जाच्या मदतीबद्दल किमला एका रात्रीसाठी पाठविण्याचे” म्हटले आहे. ही विसंगती संभ्रामक आहे.

कानिए वेस्टने 13 फेब्रुवारी 2016 रोजी ट्विट करून कर्ज फेडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. परंतु, सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी त्याला मदत करण्याचा प्रस्ताव दिल्याचा कोणताही पुरावा उबलब्ध नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने जेव्हा गुगलवर यासंबंध शोध घेतला असता दैनिक भास्कर, डेली भास्कर, द हाॅलिवूड गाॅसिप, घाना स्टार यासह विविध संकेतस्थळांवर अशा आशयाच्या बातम्या आढळून आल्या.

दैनिक भास्कर-अर्काइव्हडेली भास्कर- अर्काइव्हद हाॅलिवूड गाॅसिप–अर्काइव्हघाना स्टार-अर्काइव्ह

विविध संकेतस्थळावरील बातम्यांची पडताळणी केली असता ही बातमी World News Daily Report येथून आल्याचे दिसून येते.

ही बातमी येथे वाचा – वर्ल्ड न्यूज डेली रिपोर्टअर्काइव्ह

परंतु या बातमीतही ही पत्रकार परिषद कधी व कोठे झाली किंवा या माहितीचा कोण स्त्रोत आहे, हे उघड केलेले नाही. तसेच ही बातमी या संकेतस्थळावर कधी अपलोड करण्यात हेदेखील दिलेले नाही.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय वृत्तमाध्यमांमध्ये या घटनेबद्दल बातमी आलेली नाही.

2014 सालीदेखील अशाच प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या. मेल ऑनलाइनने 12 डिसेंबर 2014 रोजी मीडल इस्टमधील ऑनलाइन फोरमच्या दाखल्याने दिलेल्या बातमीनुसार, कथित आदेल अल-ओतैबी नामक व्यक्तीने किमच्या इन्स्टाग्रामवरील फोटोवर लिहिले होते की, “मी सौदीचा आहे आणि मी तुला एका रात्रीसाठी एक दशलक्ष डॉलर्स देईल.”

ही बातमी येथे वाचा – मेल ऑनलाइनअर्काइव्ह

परंतु, मिररच्या वृत्तानुसार किमने असा काही प्रस्ताव आल्याचे नाकारले. तिला असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे तिने सांगितले.

ही बातमी येथे वाचा – मिररअर्काइव्ह

निष्कर्ष – असत्य

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे स्पष्ट होते की, कोणत्याही सबळ पुराव्याअभावी सौदी राजपुत्राने किम कार्देशियनला एका रात्रीसाठी 71 कोटींची ऑफर दिल्याचे “माझा पेपर”ने दिलेल वृत्त असत्य आहे.

Avatar

Title:सौदी राजपुत्राने दिली किम कार्देशियनला एका रात्रीसाठी 71 कोटींची ऑफर? वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False