शिवरायांच्या जिरेटोपाची खरंच वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे का?

Mixture राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भन्नाट रे या संकेतस्थळावर “छत्रपती शिवरायांच्या 15 फुटांच्या जिरेटोपाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!” अशी बातमी आहे. या बातमीची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली आहे.

ही बातमी येथे सविस्तर वाचा भन्नाट रे | अर्काइव्ह

स्टार मराठी नावाच्या फेसबुक पेजवरून 18 फेब्रुवारीला ही बातमी शेयर करण्यात आलेली आहे. पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 30 वेळा शेयर आणि 644 जणांनी लाईक केलेली आहे. तसेच चला हवा येऊ द्या या पेजवरदेखील ही बातमी आहे.

स्टार मराठी फेसबुक-अर्काइव्ह चला हवा येऊ द्या फेसबुक-अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

‘भन्नाट रे’च्या बातमीमध्ये म्हटले आहे की, छत्रपती सेनेच्या मावळ्यांनी 12 फूट रुंद आणि 14 फूट उंच आस जिरेटोप बनवला आहे. याची नोंद “वंडर बूक ऑफ रेकाॅर्ड”मध्ये नोंद करण्यात आली आहे.

न्यूज18 लोकमत या वृत्तवाहिनीवरदेखील ही बातमी दाखविण्यात आली आणि यादेखील जिरेटोपची वंडर बूक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाल्याचे म्हटले आहे. ती बातमी तुम्ही खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये 0 ते 30 सेंकद दरम्यान पाहू शकता.

मात्र या दोन्ही बातम्यांमध्ये नेमक्या कोणत्या कॅटेगिरीमध्ये किंवा कशासाठी (उदा. सगळ्यात मोठा, सगळ्यात उंच) या जिरेटोपची नोंद झाली आहे (Record Description) हे स्पष्ट सांगितलेले नाही. वंडर बूक ऑफ रेकाॅर्ड ही मुंबई स्थित संस्था असून 2010 साली तिची स्थापना झाली आहे.

गुगलवर याचा शोध घेतला असता यूएनआय (UNI) वृत्तस्थळावर ही बातमी आढळून आली. त्यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी सेनेला या जिरेटोपाच्या निर्मितीसाठी वंडर बुक ऑफ रेकाॅर्डने प्रशंसा प्रमाणपत्र (Certificate of appreciation) दिले आहे.

यूएनआयची सविस्तर बातमी येथे वाचू शकता- यूएनआयअर्काइव्ह

बातमीतील विसंगती :

“भन्नाट रे”च्या बातमीत अनेक विसंगती आढळून आल्या आहेत.

1. जिरेटोपाची उंची किती : बातमीच्या शीर्षकामध्ये जिरेटोपाची उंची 15 फूट तर, बातमीत ठिकाणी 14 फूट म्हटले आहे. यूएनआयच्या बातमीनुसार, जिरेटोपाची उंची 14 फूट आहे.

2. जिरेटोप तयार करण्यासाठी किती कापड लागले : बातमीत एके ठिकाणी 120 मीटर कापड लागले, असे म्हटले आहे तर यूएनआयच्या बातमीनुसार, जिरेटोपासाठी 100 मीटर कापड लागले.

3. बातमी कुठली आहे : ही बातमी कुठली आहे याचीदेखील भन्नाट रेवर माहिती दिलेली नाही. यूएनआयनुसार, ही बातमी नाशिक येथील आहे.

बातमीत दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या जिरटोपाची माहिती देण्यात आली आहे. एक नाशिक येथील तर दुसरा सातववाडी येथील आहे. बातमीत तसे स्पष्ट वर्गीकरण केलेले नाही.

सातववाडी येथील बातमी “सकाळ”च्या संकेतस्थळावर दिलेली आहे.

सविस्तर बातमी येथे वाचा – सकाळअर्काइव्ह

निष्कर्ष – संमिश्र (Mixture)

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे स्पष्ट होते की, भन्नाट रे संकेतस्थळावरील बातमीच्या शीर्षकानुसार या जिरेटोपाची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाल्याचे बातमीतून स्पष्ट होत नाही. तसेच बातमीत अनेक विसंगती आहेत. त्यामुळे वाचक संभ्रमीत होऊ शकतो. म्हणून ही बातमी संमिश्र (Mixture) आहे.

Avatar

Title:शिवरायांच्या जिरेटोपाची खरंच वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: Mixture (संमिश्र)


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •